Press "Enter" to skip to content

पाणदिवे गावातील गुणवंत विद्यार्थांचा घरोघरी जावून केला सन्मान

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी । 🔶🔶🔶

उरण तालुक्यांत नव्हे तर रायगड जिल्हयात गेली वीस वर्षे सामाजिक , शैक्षणिक ,आरोग्य ,क्रीडा आदि क्षेत्रात कार्यरत असणार्या महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे ,स्व. संगिता मच्छिंद्र ठाकूर फांऊडेशन धुतूम ,स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फांउडेशन उरण व स्व. स्मिता नामदेव घरत फांऊडेशन कोपर (गव्हाण ) यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यांतील पाणदिवे गावातील १०वी व १२ वी या वर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थांचा घरोघरी जावून भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून केला सन्मान.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथदादा ठाकूर ,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवेचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण मनोज पाटील,पिरकोन ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश ठाकूर ,महेंद्र पाटील ,नेहरू युवा केंद्र अलिबाग चे राष्टीयसेवाकर्मी आकाश घरत ,मयुर पाटील ,मयुर म्हात्रे ,ओम ठाकूर,मानसी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

गेली १२वर्षे या संस्थांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थांचा सन्मान केला जातो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.