सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव- कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔷🔷
भारतीय जनता पार्टी कर्जत महिला आघाडीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे गोरगरीबांसाठी मोफत औषधे देण्यातआली . आज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला विविध समस्यांवर उपयोगी पडतील अशी अनेक प्रकारची औषधे तसेच डॉक्टरांना कोविड परिस्थितीत लागणारी सुरक्षा किट म्हणजेच पी पी इ किट , मास्क , फेस शिल्ड देण्यात आले .खोकला – कान – डोळे तसेच जखमेवर लावण्यात येणारे मलम अशी औषधें देण्यात आली .
याप्रसंगी कर्जत महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा स्नेहा गोगटे , नगरसेविका स्वामिनी मांजरे , मनीषाताई धुमणे , किसान मोर्चा कोकण संघटक सुनिल गोगटे , नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे , विजय जिनगरे , डॉक्टर सुप्रिया घोसाळकर , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बनसोडे , सर्वेश गोगटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
याप्रसंगी अधीक्षक बनसोडे यांनी रुग्णालयात औषधे दिल्याने गोरगरीब आदिवासी जनतेस त्याचा फायदा होईल , महिला आघाडी भाजपच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विविध समस्या बाबत आम्हास सहकार्य करावे असे सांगितले .








Be First to Comment