सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔷
मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी सरकारने नियमावलीही जाहीर केली. त्यामध्ये सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. कर्जतचे श्री कपालेश्वर मंदिर उघडले. काही वेळातच एका दानशूर भाविकाने स्वयंचलित सॅनिटायझर मशीनची भेट मंदिरासाठी दिली.
कर्जतचे दैवत म्हणजे श्री कपालेश्वर कोरोनाच्या काळात मंदिरे बंद होती. त्यामुळे कर्जतकर दरवाज्या बाहेरूनच श्री कपलेश्वराचे दर्शन घेत असत. सोमवार पासून मंदिरे उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याबरोबरच नियमावलीही जाहीर केली त्यामध्ये सॅनिटायझर वापरूनच मंदिरात प्रवेश करावा हा महत्वाचा नियमही आहे. मंदिर उघडून सॅनिटायझरची तात्पुरती व्यवस्था देवस्थान समितीने केली.

कर्जतचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बाळू गुरव हे मंदिरात श्री कपालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी माझ्यातर्फे स्वयंचलित सॅनेटायझर मशीन मंदिरासाठी भेट देतो. असे देवस्थान समितीचे सदस्य जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांना सांगितले.
देवस्थान समितीचे अध्यक्ष हेमंत डोंबे, अभिजीत मराठे आदींनी त्यांचे आभार मानले. ‘या मशीनचा काहीही प्रॉब्लेम झाल्यास माझ्याशी लगेचच संपर्क साधावा.’ असे बाळू गुरव यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुपारच्या वेळेस गुरव यांनी मांडे यांच्याकडे स्वयंचलित सॅनिटायझर मशीन सुपूर्द केले. हे मशीन मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला दर्शनी भागात स्वयंचलित सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले. आयुष रेणोसे या चिमुरड्याच्या हस्ते सॅनिटायझर मशीनचे उदघाटन करण्यात आले. ‘भाविकांनी मंदिरात येताना मास्क लावणे, स्वयंचलित सॅनेटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम पाळावेत.’ अशी विंनती अध्यक्ष हेमंत डोंबे यांनी केले आहे. याप्रसंगी सुरेश पिंगळे, नंदू अत्रे, दत्तात्रेय गुरव आदी उपस्थित होते.








Be First to Comment