Press "Enter" to skip to content

दिवाळीच्या हंगामात पर्यटकांची माथेरानला पसंती

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे । 🔷🔷🔷

मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर घराच्याच चौकटीत कुटुंब बंद झाली, शहरातील भ्रमंतीवरही बंधन असल्याने सहल, भटकंती यांचा तर प्रश्नच नव्हता.कालांतराने ही बंधने शिथिल होत गेली, मात्र दरम्यानच्या काळात आपण अनेक सण, उत्सव घरातच साधेपणाने साजरे केले.आता आपल्यावर फारशी बंधंनं नसली तरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, कारण ती आपली जबाबदारी आहे.त्यामुळे यंदाच्या सुट्टीत अनेकांनी किमान जवळपासच्या सहलींचा बेत आखला आहे. या सहली करण्याला मनाई नसली तरी स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणे अनिवार्य आहे.

कोरोनाचा प्रभाव पाहता व कुटुंबाची काळजी घेताना अनेकजण आपल्या जवळ व सुरक्षित पर्यटन स्थळांचाच विचार करतात व मुंबई पूना पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान ला पर्यटकांची पसंती मिळू लागली आहे दिवाळीची सुट्टी सुरू होताच येथे पर्यटकांची गर्दी दिसु लागली असून हळूहळू पर्यटकांमध्ये वाढच होताना दिसू लागले आहे.

माथेरानमध्ये सुरू असलेली गुलाबी थंडीमुळे येणारे पर्यटक खुश झाले असून धकाधकीच्या जीवनात येथील शांतता व प्रदूषण विरहित वातावरणात कोरोनाचे टेन्शन काहीकाळ विसरत आहेत हवाहवासा गारवा,गुलाबी थंडीचा हा ऋतू फिरण्यासाठी अतिशय योग्य आहे. ना उन्हाचा त्रास, ना पावसाची झड उलट सगळीकडे मस्त वातावरण असल्याने ह्या ऋतूत माथेरान हे फिरण्यासाठी योग्य असे पर्यटन स्थळ असल्याने माथेरान पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

माथेरानचे मुख्य आकर्षण असलेली मिनिट्रेन सुरू असल्याने पर्यटन खुश होत असून पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने विकेंडला शटल सेवेच्या फेऱ्याही वाढवल्याने पर्यटकांना मिनिट्रेन सफारीचा पुरेपूर आनंद घेता येत आहे.

पर्यटकांची या सुट्टयांच्या हंगामात होणारी वाढ पाहता नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी या मागणीनुसार सध्या अमन लॉज ते माथेरान  दरम्यान शटलच्या
चार फेऱ्या होत आहेत त्यामुळे अनेकांना मिनिट्रेन सफरीचा आनंद यानिमित्ताने लुटता येत आहे.प्रत्येक पॉईंटवर तसेच मुख्य रहदारी असलेल्या ठिकाणी मुख्याधिकारी प्रशांत जाधव आणि आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या बाबतीत चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रसाद सावंत –गटनेते तथा बांधकाम सभापती माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.