Press "Enter" to skip to content

स्टेपआर्ट कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था, उरण तर्फे उपक्रम

आदिवासी व वीट भट्टी कामगार महिलांना दिवाळी निमित्त साडी व खाऊ वाटप 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔶🔶🔶

“एक दीपावली आदिवासी महिलांसाठी” या संकल्पनेतून स्टेप आर्ट सामाजिक संस्थेने साई, दिघाटी व चिरनेर परिसरातील वीट भट्टी कामगारांच्या वस्तीवर जाऊन 95 कुटुंबांना नवीन साडीचे आणि खाऊचे वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

हे सामाजिक कार्य करत असताना त्या माय-भगिनींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील सुहास्य पाहून खऱ्या अर्थाने यावर्षी दिवाळीचा आनंद मिळाला तो आजपर्यंत कधीच मिळाला नव्हता असे मनोगत स्टेप आर्ट कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पप्पू सूर्यराव यांनी व्यक्त केले.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही तालुक्यातील विविध झोपडपट्टी भागात जवळपास 800 हुन अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

अश्याच गरीब व गरजूंना मदत करून दिवाळी साजरी करण्याचा संस्थेचा संकल्प आज पूर्णत्वास आला असल्याने संस्थेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्यांना समाधान वाटले.

साडी आणि खाऊ वाटप करण्यास अध्यक्ष पप्पू सूर्यराव यांच्या समवेत संस्थेचे खजिनदार देवेंद्र पाटील, संस्थेचे सल्लागार तथा सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित,तसेच सुशांत पाटील, अतिष पाटील, गणेश गावंड, गणेश म्हात्रे,पंकज जाधव, रेश्मा साळुंखे, सोनाली सूर्यराव, रुपाली खरात, प्राची कोळी, जिज्ञासा पाटील, भाग्यश्री ठाकूर आणि पियुष पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते.

दीपावली उत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असला तरी प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा दिवा पेटतोच असे नाही, प्रत्येकाला नविन कपडे, गोडधोड, स्वादिष्ट खाऊ मिळतोच असेही नाही…याच अनुषंगाने हा संकल्प हाती घेऊन संस्थेने पूर्ण केल्याने समाजातील विविध स्तरातून संस्थेच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.