Press "Enter" to skip to content

नागोठणे गावात माणसांवर भटक्या कुत्र्यांची दहशत

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । याकूब सय्यद । 🔷🔷🔷

काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा नागोठणे गावा मध्ये सुळसुळाट झाला असून त्या कुत्र्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भटक्या कुत्र्यांचा नागोठणे बाजार, पेठ खुमाचा नाका, गांधी चौक, जोगेश्वरी मंदिर परिसर, मच्छी मार्केट, खान मोहल्ला, वरचा मोहल्ला, आझाद मोहल्ला, उर्दू हायस्कूल तसेच गवळ आळी, कुंभार आळी, मराठा आळी, गुरव आळी अशा संपूर्ण परिसरामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत तसेच अपंग माणसांवर देखील दहशत निर्माण झाली आहे.

सध्या दिवाळी सण साजरा होत आहे. त्यानिमित्ताने लोक दिवाळी चे सामान खरेदी करण्याकरिता बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी जात आहेत. मात्र भटक्या कुत्र्यांना पाहून प्रत्येक माणूस कुत्र्यांचे चावा घेण्याच्या भीतीने त्रस्त व भयभीत दिसत आहे. रात्रीच्या वेळी तर आठ नऊ वाजताच भटके कुत्रे हे बाजारातून जात असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती लहान मुले तसेच महिला वर्ग व्यक्तींवर भुंकून अंगावर चावा घेण्यासाठी जातानाचा देखील प्रकार घडत आहे.

कोरोना महामारी संकटाची भीती माणसांमध्ये नुकतेच कमी झालेली दिसत असताना सध्या भटक्या पिसाळलेले कुत्र्यांची चावा घेण्याची दहशत नागोठणे गावामध्ये माणसांमध्ये निर्माण झाली आहे. तरी याकडे नागोठणे ग्रामपंचायतीने लक्ष केंद्रित करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे नागोठणेतील नागरिकांकडून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.