Press "Enter" to skip to content

माथेरानच्या कायापालटासाठी प्रसाद सावंत कटिबद्ध –राहुल पंडित

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔷

आम्ही अनेक पर्यटनस्थळे पाहिली आहेत परंतु यामध्ये माथेरानची एकंदरीत विकासात्मक दृष्टीने सुरू असलेली वाटचाल ही खरोखरच वाखाणण्याजोगी असून प्रदूषण मुक्त माथेरान मध्ये नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत हे जेवढया आत्मीयतेने या गावाच्या विकासासाठी झटत आहेत आणि खऱ्या अर्थाने माथेरानचा जो सर्वांगिण विकास होत आहे त्यासाठी सावंत कुटुंब कटिबद्ध असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असल्याचे मत रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या कुटुंबासह पंडीत माथेरान मध्ये फिरावयास आले होते त्यावेळी त्यांनी प्रसाद सावंत यांची भेट घेऊन इथे सध्या वेगाने सुरू असलेली विकासकामे त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबविली जात आहे त्याबाबत त्यांचे व नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे कौतुक केले.

पंडित पुढे म्हणाले की, मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर एमएमआरडीए च्या माध्यमातून पार्किंगची सुनियोजित पद्धतीने व्यवस्था निर्माण केली जात आहे त्यामुळे इथे आपसूकच पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यटक दिवसेंदिवस वाढत गेल्यास इथे श्रम करणाऱ्या श्रमिकांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. सर्वसामान्य लोकांना त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्रीला याचा मोठया प्रमाणावर लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात इथले रस्ते धुळविरहित होण्यासाठी क्ले ब्लॉकचे रस्ते बनविण्यात येणार आहेत त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच मुक्तपणे भ्रमण करण्यास सोयीस्कर होणार आहे. वाहतुकीची गहन समस्या असताना देखील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी प्रसाद सावंत सातत्याने पाठपुरावा करत आहेत तर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या देखील माथेरानच्या समस्या मंत्रालयात संबंधित वरिष्ठांकडे पोटतिडकीने मांडत असतात याचा मी साक्षीदार आहे असेही राहुल पंडित यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी सावंत कुटुंबाने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन हॉटेल हॉर्स लँड मध्ये छोटेखानी सत्कार केला.यावेळी हॉटेल मालक अडी भरुचा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.