Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये अपुऱ्या हातरीक्षांमुळे जेष्ठ पर्यटकांची गैरसोय

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔷

माथेरान मध्ये पर्यटकांच्या वाहतुकीसाठी ब्रिटिश काळापासून हातरीक्षा मध्ये जेष्ठ,वृद्ध पर्यटकांना आजवर सेवा उपलब्ध करून देत आहेत.त्यामुळे येणारे वृद्ध पर्यटक या सेवेचा लाभ घेत असतात.आठ महिन्याच्या लॉक डाऊन नंतर २ सप्टेंबर रोजी माथेरान अन लॉक केल्यानंतर हळूहळू इथे पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी हंगाम सुरू झालेला असताना सुध्दा एकूण ९४ हातरीक्षा पैकी केवळ पंचवीस हातरीक्षाच चालकां अभावी कार्यरत आहेत.

एका हातरीक्षावर तीन मजूर कार्यरत असतात.जवळपास अडीचशे मजूर हे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. हेच मजूर ही अतिकष्टदायी कामे करत असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन केल्यामुळे मार्च महिन्यात बहुतांश मजूर हे आपल्या गावी निघून गेले आहेत. स्थानिक श्रमिक हे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच ही कामे नाईलाजाने आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी करत आहेत.या हातरीक्षाचे मालक ही कामे करत नसून अनेकजण या हातरिक्षा वार्षिक भाडेतत्त्वावर देत असतात.त्यामुळे जेमतेम पंचवीस रिक्षा रस्त्यावर पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देत आहेत.

त्यातच इथे आगामी काळात ई रिक्षा सुरू होणार असल्याने अनेकांनी हातरीक्षा व्यावसायिकांनाच ई रिक्षाचा लाभ प्रथमतः घेता येणार असल्याने दहा हजार रुपयांना बनणा-या या रिक्षा दहा पटीने अधिक रक्कम मोजून विकत घेतल्या आहेत.

पुन्हा एकदा लॉक डाऊन होणार आहे की काय याच भीतीपोटी यवतमाळ जिल्ह्यातील मजूर इथे येण्यास धजावत आहेत त्यामुळे अपुऱ्या हातरीक्षामुळे जेष्ठ पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. याकामी लवकरात लवकर इथे पर्यटकांच्या वाहतुकीची सोय उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई रिक्षा सुरु करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.