मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा पोयंजे विभागात भगवा झंझावात 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔷🔶
दिपावलीच्या सुरवातीलाच पनवेल तालुक्यातील शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते निलेश बाबरे यांनी मा.आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, बारवई व समता नगर आदिवासी येथील २००-२५० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळी मा.आमदार भोईर साहेबांनी प्रवेशकर्त्यांच्या हाती भगवा ध्वज व शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. मा.आमदार भोईर साहेबांनी प्रवेश कर्त्याना संबोधतना सांगितले की, तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवून प्रवेश केलात,

त्याला कुठेही तडा जाणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो, तसेच माझ्या मार्फत आमदार असताना जशी विकास कामे या विभागात केली. त्याचप्रमाणे यापुढेही आपल्या महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून सातत्याने करत राहीन असे उद्गार काढले.

यापक्षप्रवेशावेळी पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, तालुका संपर्कप्रमुख आनंतशेठ पाटील, उद्योजक मोहनशेठ लबडे, उपतालुका प्रमुख जगदीश मते, माजी उपसभापती गजानन मांडे, उपतालुका संघटक सुधीर पाटील, विभाग प्रमुख नितीन पाटील, महेंद्र गायकर, किशोर पाटील, कमलाकर लबडे, शाखा प्रमुख नरेश पडवळ, प्रणव लबडे आदी मान्यवर तसेच विभागातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.









Be First to Comment