बोर्ली ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी केले अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान 🔶🔶🔶
ठरावाच्या बाजूने 696 तर विरोधात 570 मते 90 मते बाद 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । मुरूड । 🔷🔶🔷
मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच नौशाद दळवी यांच्याविरोधात टाकण्यात आलेल्या अविश्वास ठरावबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या आदेशानव्ये बोर्ली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा ही मुरूड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रविंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच नौशाद दळवी यांच्यावर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ सदस्यनी अविश्वास ठराव आणला होता. सरपंच नौशाद दळवी हे थेट जनतेतून निवडून असल्याने अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले होते.त्यानुसार 12 नोव्हेंबर 2020 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

या वेळी ग्रामस्थांनी सरपंच म्हणून सरपंच नौशाद दळवी याना नाकारत विरोधकांनी त्यांच्यावर टाकलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करीत 126 मते अधिक दिली. सदर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा पदभार हा उपसरपंच मतीन सौदागर यांचेकडे सोपविण्यात आले असल्याचे सभेचे अध्यक्ष नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी जाहीर केले.
सदर निवडणूक प्रक्रिया ही पार पाडण्यासाठी रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडली नाही.








Be First to Comment