सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔷
रसायनी विभागातील प्रिआ असोसिएशन या संस्थेमधील शुल्क वाढ व पालकांच्या इतर तक्रारी संदर्भात असोसिएशन कमिटी सोबत बैठक पाताळगंगा प्रिआ असोसिएशन सभागृहात घेण्यात आली.त्याठिकाणी प्रिया असोसिएशनच्यावतीने गुरव, कदम व प्राध्यापक रॉय मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी पालकांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली व शिक्षण संस्थेने देखील सर्व मागण्या ऐकून यावर सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेली
पालकांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड यांनी संस्थेला केले अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
त्याठिकाणी माझ्या सोबत रा.जि.यु.काँ उपाध्यक्ष सागर सुखदरे, पिटीआयचे सर्व सदस्य, शालेय विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.








Be First to Comment