Press "Enter" to skip to content

२६ नोहेंबरचा देशव्यापी संप रायगड जिल्हात १००% व्यसस्वी करणार

रायगड जिल्हा संयुक्त कामगार संघटना कृती समितीच्या बैठकीत निर्णय 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔶🔶

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या पनवेल येथील कार्यालयात नुकतीच रायगड जिल्हा संयुक्त कामगार संघटना कृती समिती सहभागी विविध २८ सघंटना पदाधिकारी याची बैठक झाली.बैठकीचे प्रास्ताविक काॕ.संदिप पाटील यांनी केले.बैठकीचे संचालन रायगड जिल्हा कृती समितीचे निमंत्रक काॕ.कृष्णा भोयर यांनी केले.दि.२६ नोहेंबर २०२० रोजी देशव्यापी संप देशातील १० केंद्रीय कामगार सघंटना व स्वतंत्र फेडरेशन यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयोजित केला असुन खालील मागण्यासाठी संप आयोजित केलेला आहे.

याबाबत विस्तृत चर्चा कामगार,कष्टकरी सघंटना पदाधिकारी यांच्यात होवुन रायगड जिल्हात संप १०० % व्यसस्वी करण्यासाठी दि.२१.११.२०२० रोजी दुपारी १.०० वाजता कर्नाळा स्पोर्ट सभागृह पनवेल येथे जिल्हा समेंलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक तालुक्यात मोर्चा काढून तहसिलदार याना निवेदन देणे,जिल्हाभर बॕनर लावणे,संपाबाबत प्रञक तयार करुन वाटणे,रायगड जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाना संपात सहभागी होण्यासाठी आव्हान करणे इत्यादी निर्णय घेण्यात आले.

ैठकीस आॕल इंडिया ट्रेड युनियन काॕग्रेसचे कॉ.उदय चौधरी, वीज कामगार व आयटक नेते काॕ.कृष्णा भोयर,काॕ.भांरती भोयर,अॕड.सजंय जवरकर,अॕड.आनंद भोईर,इटंक नेते श्री.महेंद्र जी घरत,श्री वैभव पाटील,श्री रवी घरत, श्री.पी.के.रमण, कॉ.शशी यादव,(सी आय टी यु नेते ) व जेएनपीटी विश्वस्त कॉ.भूषण पाटील,कॉ मधुसूदन म्हात्रे,काॕ.संदिप पाटील,म्युनिसिपल कामगार नेते कॉ.सुरेश ठाकूर,रायगड श्रमिक एकता संघ श्री.सुभाष देशपांडे रायगड श्रमिक एकता संघ,भारत पेट्रोलियम कॉ.राजेश ठाकूर, जनआंदोलन नेत्या काॕ.उल्का महाजन,काॕ सुरेखा दळवी,नॅशनल हॉकर्स फेडरेशन मा.विनिता बालीकुंद्री,वीटभट्टी कामगार संघटना मा.नॅन्सी गायकवाड,महाराष्ट्र जा.क.का.युनियन श्री.वसंत काळुराम पवार,महाराष्ट्र जागृत कष्टकरी कामगार युनियन चे श्री.अनिल सोनावणे,श्रमिक क्रांती सघंटनाचे श्री.दिलीप डाके,पाडुंरग पारधी,मुंबई पोर्ट ट्रस्ट श्री.राजन म्हाञे,अंगनवाडी,आशा सफाई कामगार सघंटना श्री.दिनकर म्हाञे,टि.डी.एफ चे श्री.महेद्रं पाटील, माथाडी कामगार युनियन देविदास बोराडे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्री.आर.व्ही.शिरसाठ, राज्य सरकारी कर्मचारी सघंटना श्री.संदिप नागे,रायगड जिल्हा शेतमजुर सघंटना अॕड.गोपाळ शेळके,रमेश आंबवणे उपस्थित होते.

दि.२६ नोहेंबर संपाच्या मागण्या

१) आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना ६ महिने मासिक ७५०० रुपये अर्थसहाय्य. सर्व गरजूंना पुढील ६ महिन्यांसाठी दरडोई १० किलो मोफत अन्नधान्य.

२) रेशनव्यवस्था बळकट करून त्यात रॉकेल व साखर सहित सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण, वस्तूंच्या बाजारातील सट्टेबाजीवर बंदी, पेट्रोल, डिझेलवरील करांमध्ये कपात अशी पावले उचलून महागाई रोखा.

३) मनरेगाच्या अंतर्गत ६०० रुपये रोजावर २०० दिवस काम किंवा बेरोजगार भत्ता, शहरी भागासाठी रोजगार हमी कायदा करून त्याची अंमलबजावणी

४) सर्वांना नोकऱ्या किवा बेरोजगार भत्ता, रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलून बेरोजगारीवर नियंत्रण आणा. उद्योगांसाठीच्या प्रोत्साहन पॅकेजला रोजगार सुरक्षेशी जोडा

५) जीवनावश्यक वस्तू, शेतीमाल व्यापार, वीज कायदा, कामगार कायदे, पर्यावरण परिणाम मूल्यांकन या कायद्यांमधील दुरुस्त्या तसेच राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान व नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या.

६) वित्त क्षेत्रासहित सर्व सार्वजनिक क्षेत्र उद्योगांचे खाजगीकरण थांबवा. रेल्वे, विमा, बंदरे व संरक्षण अशा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक व खाजगीकरण नको

७) सर्वांसाठी मोफत सार्वत्रिक आरोग्यसेवा, केंद्रीय योजनांवरील बजेट तरतूदीत वाढ. रुग्णालयासहित आरोग्य सेवा, आयसीडीएस व एमडीएमएस सहित पोषण आणि शिक्षण या मूलभूत सेवांचे खाजगीकरण करण्याचे प्रस्ताव मागे घ्या.

८) कोविड-१९चे कर्तव्य बजावणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, एनएचएम कर्मचारी यांसहित सर्वांना सुरक्षा साधने,५० लाखांचा विमा,जोखीम भत्ता, नुकसानभरपाई, मोफत औषधोपचार, प्राधान्याने कोविडची लस

९) योजना कर्मचाऱ्यांचे ४५ व ४६व्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार कर्मचारी म्हणून नियमितीकरण, २१००० रुपये किमान मासिक वेतन, १०००० रुपये मासिक पेन्शन, ईएसआय, पीएफ सहित सामाजिक सुरक्षा

१०) सर्व मूलभूत कामगार कायद्यांची पुनर्स्थापना करून त्यांची कडक अंमलबजावणी. कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई. कामाच्या तासात ८ वरून १२ अशी वाढ करू नका. शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने वेळेआधी निवृत्त करण्याचे क्रूर परिपत्रक मागे घ्या.

११) सर्व कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, तमाम कष्टकरी जनतेला किमान १०००० रुपये पेन्शनची हमी. नवीन पेन्शन योजना रद्द करा, आधीचे पेन्शन पुन्हा लागू करा, ईपीएस-९५ मध्ये सुधारणा करा.

१२) बारमाही, कायमस्वरुपी कामांमध्ये कंत्राटीकरणाला मज्जाव आणि समान व एकसारख्या कामासाठी कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांइतके वेतन व अन्य लाभ. सर्व क्षेत्रात निश्चित कालीन रोजगारावर बंदी.

१३) बोनस, भविष्य निर्वाह निधीची रक्कम व पात्रतेवरील कमाल मर्यादा काढून टाका. ग्रॅच्युईटीचे प्रमाण वाढवा

१४) असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा, पेन्शन, इ एस आय, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.

१५) अर्ज केल्याच्या ४५ दिवसांच्या आत कामगार संघटनांची नोंदणी अनिवार्य करा. आयएलओ सनद सी ८७ व सी ९८ ला ताबडतोब मान्यता द्या.

१६) कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी, सर्व कामांच्या ठिकाणी व असंघटित कामगारांसाठी स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचे गठन

१७) कामकाजी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व आरामकक्षांची सुविधा, सर्व कामकाजी महिलांना ६ महिन्यांची पगारी बाळंतपणाची रजा, महिला काम करीत असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये पाळणाघरांची सुविधा, समान किंवा सारखे काम करणाऱ्या महिला व पुरुषांना समान वेतन

१८) स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना सी२+५० या सूत्रानुसार किफायतशीर भाव. जबरदस्तीने जमीन अधिग्रहण नको. जमीन अधिग्रहण कायदा २०१३ची प्रभावी अंमलबजावणी करा. शेतकऱ्यांना कर्जमाफी, तातडीची कोरड्या, ओल्या दुष्काळात मदत व नुकसानभरपाई, पशुपालन साखळीला सुरक्षा व प्रोत्साहन

१९) जातीच्या आधारावर भेदभाव, सामाजिक दमन आणि दलित, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. सार्वजनिक व शासकीय क्षेत्रात रिक्त जागांवर भरती व त्यात आरक्षणाची अंमलबजावणी. खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.