Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेचे पत्र


पुई नळपाणी पुरवठा दुरुस्ती योजना 🔶🔶🔶


सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔷🔷

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आ.अनिकेत तटकरे यांच्या कडून रोहे तालुक्यातील पुई ग्रा.पं. नळपाणी पुरवठा योजना दुरूस्ती साठी प्रशासकीय मान्यतेचे पत्र पुई ग्रामस्थांच्या हाती देण्यात आले आहे.

कोकणचे रायगडचे खासदार
सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सहयोगाने व मार्गदर्शनाखाली आ.अनिकेत तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी नळपाणी पुरवठा योजना दुरूस्तीसाठी प्रशासकीय मान्यता पत्र देण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आ.अनिकेत तटकरे यांच्या
सुतारवाडी येथील निवासस्थानी संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात सदरचे पत्र देण्यात आले आहे.

यावेळी मा.सरपंच संजय मांडलुस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनंत सानप,प्रविण धामणसे, चंद्रकांत फाटे,संजय दिसले,गंगाराम दळवी, हरिश्चंद्र कदम,मधुकर दिसले,समीर पडवळ,सुधाकर दिसले आदी उपस्थित होते. तर मागील आठवड्यातच आ.अनिकेत तटकरे यांनी पुई ग्रामस्थांना भेडसावत असणारी विद्युत समस्येचा प्रश्न मार्गी लावून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळवून दिला होता. तर नुकतेच नळपाणी पुरवठा दुरुस्ती योजना दुरूस्तीसाठी प्रशासकीय मान्यतेचे पत्रही दिले असल्याने लवकरच पाणी प्रश्न मार्गी लागून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची लवकरच चांगली व्यवस्था होईल तर आ.अनिकेत तटकरे यांनी वीज व पाणी या दोन जिव्हाळ्याच्या समस्या लागोपाठ मार्गी लावल्याने आमच्या पुई ग्रामस्थांच्या वतीने त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच असल्याची प्रतिक्रिया मा.सरपंच संजय मांडलुस्कर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले .
.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.