Press "Enter" to skip to content

वरसगाव ग्रा.पं.उपसरपंचपदी दीप्ती सानप यांची निवड


सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔶🔶🔶


रोहे तालुक्यातील वरसगाव ग्रा.पंचायतीचे उपसरपंचपदी
दीप्ती सानप यांची निवड करण्यात आली आहे.

रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी विविध माध्यमातून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून झाल्याने या ग्रा.पंचायतीचा सर्वांगीण विकास होताना दिसत आहे. तर तर सद्यस्थितीत ग्रा. पं.हद्दीत सुमारे २ कोटीच्या आसपास विकासकामे चालली याचे सारे श्रेय हे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांना जात असून विकासाचा हा रथ असाच चालू रहावा यासाठी उपसरपंचपदी पाच वर्षात जास्तीत जास्त सदस्यांना संधी कशी मिळेल या उद्देशानेच उपसरपंचपदी दीप्ती सानप यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मा.सरपंच संजय राजिवले यांनी दिली आहे.

यावेळी पं.समिती सदस्या सिद्दी राजिवले,सरपंच विशाखा राजिवले,मा.सरपंच संजय राजिवले, मा.उपसरपंच राकेश शिंदे,पुई मा.सरपंच संजय मांडलुस्कर,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्येकर्ते एकनाथ बागुल,अशोक लहाने,दाजी भालेकर,बाळ्याभाऊ सानप,परशुराम मामलुस्कर,हरिश्चंद्र सानप,मंगेश भालेकर,अमोल सानप आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.तर आपल्या निवडीनंतर उपसरपंच दीप्ती सानप यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास टाकून उपसरपंचपदी निवड केली आहे.त्या विश्वासास पात्र होऊन जास्तीत जास्त ग्राम पंचायतीचा विकास कसा होईल यासाठी आपण लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.