Press "Enter" to skip to content

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या प्रयत्नांमुळे शटल सेवेच्या दोन फेऱ्यात वाढ

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔷

सुट्टयांचा हंगाम सुरू झालेला असताना केवळ मिनिट्रेनची मजा लुटण्यासाठी येणा-या पर्यटकांना शटलच्या सध्या सुरू असलेल्या दोन फेऱ्यांमुळे ह्या प्रवासाची सैर करता येत नव्हती त्यामुळे पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत होते. त्यामुळे एकंदरीत याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने निदान शटल सेवेतून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणखीन दोन फेऱ्यांची वाढ दि.१४ नोव्हेंबर पासून शनिवारी आणि रविवारी या सुट्टयांच्या दिवशी करण्यात येणार आहे.

मिनिट्रेन फेऱ्यात वाढ करण्याबाबत तसेच नेरळ माथेरान ट्रेन सुध्दा सुरू करावी याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले होते जेणेकरून इथे पर्यटकांची संख्या वाढल्याने सर्वांच्या रोजगारात आपसूकच वाढ होऊ शकते त्यानुसार दि.१४ नोव्हेंबर पासून दर शनिवारी आणि रविवारी एकूण चार फेऱ्या करण्यात आल्या आहेत.

वेळापत्रक

शनिवार आणि रविवार
माथेरान ते अमन लॉज सकाळी १०-२०
दुपारी ०३-१०

अमन लॉज ते माथेरान
सकाळी -१०-३८
दुपारी– -०३-२८

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.