सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔷🔶🔷
आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन तसेच नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे (वाशी, नवीन पनवेल) कार्याध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष यांना या वर्षीचा स्व.वसंत डावखरे यांच्या स्मृती दिनानिमित्त दिला जाणारा “वसंतस्मृती आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कार-२०२० ” हा पुरस्कार कोकण विभाग पदवी मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे , ठाण्याचे आमदार संजय केळकर,ठाणे म.पा.स्थायी समिती सभापती संजय चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात ३७ शिक्षक, आणि तीन संस्था चालक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून कोकण विभागातील उपक्रमशील, प्रयोगशील व प्रज्ञाशील शिक्षण संस्थाचालक यांना , शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान व अद्वितीय कामगिरी याची दखल घेऊन सोशल डिस्टंसिग, मास्क, सँनिटायझर इ.वापर करून मो. ह. हायस्कूल,आणि कनिष्ठ महाविद्यालय ठाणे (प.) येथे पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी धनराज विसपुते म्हणाले कि,सदर पुरस्कार हा आदर्श शैक्षणिक समुहातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान असून या क्षेत्रात सर्वाचे अनमोल योगदान आहे.असे यावेळी म्हणाले.या पुरस्काराबद्दल आदर्श शैक्षणिक समूह, नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ,आप्तेष्ट ,मित्रमंडळी यांचेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment