सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔷🔷
कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत तायडे यांची बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर रोहा पोलिस ठाण्यातून कोलाड पोलिस ठाण्यात बदली होत कोलाड पोलिस ठाण्यात नवे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांनी नुकताच पदभार स्विकारल्या नंतर कोलाड पत्रकारांनी त्यांची सदिच्छ भेट घेतली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोलाड पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक रुजू झालेले सुभाष जाधव हे मूळचे वाई सातारा येथिल असले तरी त्यांचे बालपण रोह्यात गेले यामुळे त्यांना रोहा तालुक्याच्या पूर्णपणे अभ्यास आहे.तसेच त्यांनी पूणे व नाशिक येथे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून महत्वाची भुमिका बजावली आहे.परंतु कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले कि, गुन्हेगारांना आला घालण्यासाठी कोलाड परिसरातील नागरीक व पत्रकार यांनी माझ्या सहकार्यात महत्वपुर्ण सहकार्याची साथ असावी असे सांगितले.
प्रसंगी यावेळी सुतारवाडी येथील पत्रकार हरिचंद्र महाडिक,चिल्हे खांब येथील श्यामभाऊ लोखंडे, गोवे कोलाड येथील विश्वास निकम,चिंचवली कोलाड येथील भिवा पवार,उपस्थित होते.








Be First to Comment