सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔷
सलग आठ महिने लॉक डाऊन मुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरान मधील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे त्यातच सर्वांचा आवडता सण दिवाळी आल्याने हा सण कशाप्रकारे साजरा करावा या विवंचनेत असताना नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना विविध प्रकारची मिठाई त्याचबरोबर आकाश कंदील, सुगंधी उटणे,आणि दिवाळीची शुभेच्छा ग्रीटिंग कार्ड भेट दिली आहे.
अनेकदा निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी पाच वर्षात आपल्या प्रभागाकडे ढुंकूनही पाहत नाहीत असे प्रकार आजवरच्या कालखंडात अनेकांनी अनुभवले आहेत परंतु याला बगल देत आपल्या प्रभागातील नागरिकांशी सातत्याने चर्चेत राहून तेथील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रसाद सावंत यांनी तत्परता दाखवून अनेक महत्वकांक्षी कामे अन्य प्रभागासह इंदिरा गांधी नगर या प्रभागातील मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.
जरी लॉक डाऊन काही काळा पुरता का होईना उठविले असले तरी सुद्धा
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रसाद सावंत यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी मिठाईचे वाटप केले आहे.नेहमीच आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रसाद सावंत हे सदैव तत्पर असतात. अडीअडचणी वेळी मदतीसाठी,आणि प्रामुख्याने सुखदुःखात केव्हाही पुढाकार घेत असतात त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.







Be First to Comment