Press "Enter" to skip to content

नवीन शेवा सरपंच निशांत घरत यांना ग्रामस्थांनी दाखविला घरचा रस्ता

निशांत घरत यांच्या वरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनश्याम कडू । 🔶🔶🔶

थेट सरपंच निवडणुकीत नवीनशेवा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निशांत घरत निवडून आल्यानंतर जॉईंट किल्लर म्हणून गवगवा करण्यात आला होता. मात्र या जॉईंट किल्लर म्हणून समजल्या जाणाऱ्या सरपंच निशांत घरत यांच्यावरील अविश्वास ठराव आज बहुमताने मंजूर करण्यात आल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

यावेळी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांसह गावातील ६२९ विरुद्ध ३०२ मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

३ वर्षापूर्वी थेट सरपंच निवडणुकीत नवीनशेवा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निशांत घरत हे निवडून आले होते. निवडून आल्यानंतर ते जॉईंट किल्लर म्हणून ओळखले जात होते. परंतू निष्क्रिय व मनमानी कारभार यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांनी अविश्वास ठराव मांडला होता व तो ८ विरोधात २ या फरकाने मंजूर झाला होता. नंतर ग्रामसभेत ग्रामस्थांपुढे आज गुरुवार दिनांक 12/12/20 रोजी ठराव मांडण्यात आला.

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी भूमिका मांडली. त्यानंतर झालेल्या मतदानात ग्रामपंचायतीच्या नऊच्या नऊ सदस्य यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी ६२९ विरुध्द ३०२ मतांनी ठराव पास करून सरपंच निशांत घरत यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस शे का पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थानी यामध्ये महत्वाची भूमिका पार पडली. याबाबत उरण तहसील कार्यालयात संपर्क साधला असता त्यांच्याकडे माहिती नसल्याचे उत्तर देण्यात आले.

अविश्वास ठरावाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ

या नंतर झालेले आभार सभेत ग्रामस्थांना धन्यवाद दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक कृष्णा घरत, कामगार नेते दिनेश घरत, गणेश घरत, जगजीवन भोईर, शाखाप्रमुख शैलेश भोईर, शेकापक्षचे किसन सुतार, महेश म्हात्रे, काँग्रेसचे एकनाथ घरत, श्रेयश घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवराम घरत, महिला आघाडी च्या वैशाली सुतार, मयुरी घरत, उपसरपंच वनिता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भोईर, नीरज दरने, नयना ठाकूर मंजुळा घरत, हितेंद्र घरत, रंजना घरत, जयश्री घरत, भूपेंद्र पाटील व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.