Press "Enter" to skip to content

रास्ता रोकोची जय्यत तयारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

शिहू नागोठणे पोयनाड जीवघेण्या मार्गाच्या प्रश्नावर शेतकरी संघर्ष समिती आक्रमक 🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔷🔷

शिहू  नागोठणे पोयनाड S.H.87 हा वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या रस्त्याची आजमितीस प्रचंड दुरावस्था झाली आहे. या मार्गाची प्रचंड चाळणं झाली आहे. या मार्गातील जीवघेणे खड्डे भरुन रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

रस्त्याची आठ दिवसात सुधारणा न झाल्यास शिहू फाटा ch.no.18/500 वर आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता व शाखा अभियंता श्री बागुल यांची  शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री अनंत भुरे, के.के.कुथे अप्पा,सुरेश महादेव कोकाटे,वसंत मोकळ,जानु कुथे,नथूराम म्हात्रे बॉस,व नारायण म्हात्रे यांनी कार्यालयात जावून भेट घेतली व  प्रत्यक्ष कामाची मागणी करून निवेदन दिले. पोयनाड  नागोठणे रस्ता हा जिल्ह्यातील मुख्य रस्ता असुन  रस्त्याची आजघडीला प्रचंड दुरावस्ता झाली असुन गेली वर्षभर कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम झाले नाही. तसेच डांबरीकरण व पावसाळी खड्डे भरणे असे कोणत्याही प्रकारचे काम झाले व केलेले नसल्याने जनता प्रचंड त्रस्त झालेली आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे, रुग्ण, गर्भवती महिला, कामगार, प्रवाशी वाहनचालक या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.  गणेशोत्सव, स्वतंत्र्य दिन, नवरात्री ,दसरा दिवाळी असे कित्येक वर्षे सण आले व गेले मात्र रस्त्याची सुधारणा काही केल्या होईना, त्यामुळे जनतेत देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणा व नियोजनशून्य कामाबाबत संताप व्यक्त होताना दिसत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला पोयनाड  नागोठणे रस्त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष  झाले आहे. लोकांच्या जीविताशी आपण खेळ चालू केला असल्याचे निवेदनात खडसावले आहे. पोयनाड नागोठणे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे. रस्त्यातील मोठमोठ्या खड्डयांनी  रस्ता खचला आसुन या  रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. रस्त्यावरील पूल सुद्धा कमकुवत झाले असुन पूल कोसळून केव्हा जीवितहानी होईल हे सांगता येत नसल्यामुळे वाहन चालक ch.no.15/500 to ch.02/00 पर्यंत पर्यायी रस्ता म्हणून MIDC चा सर्विस रोड चा वापर करत आहेत. 

 जनता, प्रवासी , वाहन धारक या रस्त्याचे पुर्ण व मोठ्या प्रमाणात वहातूक प्रवास करत आहेत.तो रस्ता सुद्धा अरुंद असल्यामूळे त्या रस्त्यानी एकच गाडी जावू शकते असा रस्त्यावरुन मोठी वाहतुक सध्या परिस्तितीतून चालू आहे.सदर रस्ता अरुंद व सर्विस रोड मुले तिथे सुधा अपघात होत आहेत आणि होनारे अपघातास सर्वस्वी सार्वजनीक बांधकाम विभाग असुन आम्ही सदर पोयनाड नागोठणे रस्ता त्वरित खड्डे भरणे व सुधारणा करण्यासाठी व पुढिल होणारे अपघात टाळण्यासाठी आपण त्वरित काम करावे, अन्यथा आम्ही कवडी मोल भावाने शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीतून रस्ता काढून आमच्या जमिनी तरी परत करा. लोकांच्या जीवांशी खेळण्या पेक्षा रस्ता नसलेला परवडेल अशी परिस्तिती उदभवली आसुन आपण जर त्वरित खड्डे व सुधारणा केली नाहित तर शिहू फाटा ch 18/500 ला मोठे जन आंदोलन करुन रस्ता रोको करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदर निवेदनाची प्रत माहितीसाठी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कोकण भवन, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक, रायगड,उपविभागीय अधिकारी, पेण , पोलिस उपविभागीय अधिकारी,रोहा, मा.पोलिस निरिक्षक , नागोठणे, पोलिस निरिक्षक,पोयनाड, उपविभागीय उपअभियंता सा.बा.उपविभाग अलीबाग,  तहसीलदार ,पेण आदींना देण्यात आल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.