Press "Enter" to skip to content

नारायण सोनावणे “कर्जत कोव्हीड योद्धा” पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔷

“कर्जत कोविड योद्धा” म्हणून नारायण सोनवणेंचा पं.समिती कडून सत्कार करण्यात आला. पंचायत समिती कर्जतच्या मासिक सभेत “कर्जत कोविड योद्धा “म्हणून रायगड जिल्हा परिषद केंद्र वैजनाथचे केंद्रप्रमुख नारायण भिकू सोनवणे यांचा तालुक्याचे सभापती माननीय सुजाता यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.

रायगडभूषण नारायण सोनवणे यांनी कोरोना मधील या महामारीच्या काळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. संपूर्ण जगासोबत भारत कोवीड विरोधात लढत असताना नारायण सोनवणे यांनी आपल्या कर्जत तालुक्यातील आदिवासी,गरीब,गरजू, दिव्यांग बांधवांच्या कुटूंबा साठी १७२१ पेक्षा जास्त अन्नधान्य,जी वस्तू,व कोविड १९ पासून सुरक्षा देणारे साधने मोफत घरपोच केले आणि करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक अडचणींना सामोरे जात प्रसंगी केंद्रातील गावातून विद्यार्थ्यांसाठी “शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी”ही शिक्षणप्रक्रिया अखंडित ठेवली आहे. देश ,समाजातील, कुटुंबातील व्यक्तींची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षा,आरोग्य व शिक्षणासाठी ते अहोरात्र करीत असलेल्या कार्यकर्तृत्वाचा पंचायत समितीने “कर्जत तालुका कोविड योद्धा” म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव केला.

कोविड १९ च्या या कालखंडात शासकीय जबाबदारी सांभाळत विविध शैक्षणिक उपक्रमे व प्रयोगातून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे अविरत कार्य करीत आहेत. सभेत रायगडभूषण अरुण जोशींना सुध्दा यावेळी समाज सेवेबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत कर्जतच्या सभापती माननीय सुजाता मनवे , उपसभापती भीमाबाई पवार व सर्व सदस्य, गटविकास अधिकारी बालाजी पुरी,सहायक गटविकास अधिकारी रजपूत, गटशिक्षण अधिकारी दौड,विस्तार अधिकारी अहिरे व शिक्षणविस्तार अधिकारी हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते .उपस्थितांनी नारायण सोनावणे याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.