सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷
लायन्स क्लब ही एक नंबरची जागतिक पातळीवरील सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने नागोठणे परिसरात विवीध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. याच अनुषंगाने लायन्स क्लब नागोठणे कडून इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या प्रिप्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका निलम शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन संदिप नायर, चार्टर प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन , उपाध्यक्ष लायन संतोष झोलगे, अॅक्टीव्हीटी चेअरमन लायन यशवंत चित्रे, सचिव एमजेएफ लायन विवेक सुभेकर, खजिनदार लायन संतोष शहासने, लायन विलास चौलकर, लायन अजित घोडींदे यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कोकण एज्यकेशन सोसायटीचे नागोठण्यातील अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, उर्दू हायस्कुल नागोठणे, माध्यमिक विद्यालय वेलशेत, ऐनघर, पळस , वांगणी येथील हायस्कूल, भारतीय एज्युकेशन सोसायटीचे वेलशेत येथील एस.डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूल, होली एंजल्स स्कुल आदी शाळेतील पहिल्या तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून सामाजिक कार्यकर्ते लायन पांडूरंग शिंदे त्याचप्रमाणे कै. सुलेखा यशवंत चित्रे यांचे स्मरणार्थ लायन यशवंत चित्रे यांनी अनमोल सहकार्य केले. दरम्यान या कार्यक्रमासाठी नागोठणे सरपंच डॉ.श्री मिलींद धात्रक यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन यशवंत चित्रे यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment