सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔷🔷
शासन दरबारी अनेक वर्षापासून ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ओबीसी समाजातील बारा बलूतेदार व ओबीसी समाजात मोडणाऱ्या इतर समाजाचे प्रश्न त्यांचे सामाजिक आर्थिक, शैक्षणिक व शासकीय सेवेत नोकरी असे अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाला एकत्रित आणून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी रोहा तालुका ओबीसी महासंघाची स्थापना करणे आवश्यक आहे. ही संघटना लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी कुणबी समाजाचे, ओबीसी समाजाचे नेते सुरेश मगर हे पुढाकार घेत असून ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांशी संपर्क साधत माहिती मगर यांनी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते पक्ष भेद बाजूला ठेवून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्रित लढ़ा संघर्ष करण्यासाठी एकत्र येत आहेत, ही ओबीसी समाजाच्या दृष्टीने महत्वाची बाब समजली जाते, एकत्रित लढा दिल्याने ओबीसींचे शासन दरबारातील प्रलंबित प्रश्न निश्चित सुटतील, याबाबत ओबीसी महासंघ निर्माण करण्यासाठी ओबीसी नेत्यांची बैठका सुरु असल्याचे सांगण्यात आले. ओबीसी समाजातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सुरेश मगर , उदय मोरे यांच्याशी अधिक माहितीसाठी व ओबीसी संघटनेबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी संपर्क साधावा असे ही आवाहन ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.







Be First to Comment