राष्ट्वादी काँग्रेस मध्ये तरुणांची मजबूत फळी निर्माण करणार : युवा नेते जयवंत मुंढे 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔶
रायगडचे खासदार सुनिल तटकरे साहेब, पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे तसेच आमच्या तरुणांचे नेते आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी युवक काँग्रेस रोहा तालुका अध्यक्षपदी माझी नेमणूककरून माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता मला मिळालेल्या संधीचे सोने करणार असून आ.अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील सर्व जि.प. मतदार संघातील २० तरुणांची कोअर कमिटी स्थापन करून तरुणांची मजबूत फळी निर्माण करणार आहे. या माध्यमातून पक्ष संघटना वाढविणार असा आत्मविश्वास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित रोहा तालुका अध्यक्ष जयवंत मुंढे यांनी नागोठणे येथे व्यक्त केला.
नागोठणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानी नुकत्याच संपन्न झालेल्या युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आढावा बैठकीच्या वेळी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना जयवंत मुंढे बोलत होते. यावेळी नागोठणे विभागीय नेते भाई टके, पेण विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, माजी तालुकाध्यक्ष महेंद्र पोटफोडे, युवानेते राकेश शिंदे, पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी, कडसुरेचे सरपंच राजेंद्र शिंदे, सचिन कळसकर, निवास पवार, अतुल काळे, अकलाख पानसरे,दिपेंद्र आवाद, प्रमोद जांबेकर, मनोज टके, श्रीपाल जैन, किशोर कदम, अमित जांबेकर, डॉ. सनी धात्रक, शंकर भालेकर, अक्षय नागोठणेकर, केतन भोय, विरेन जैन, मोरेश्वर सगणे, ऋषिकेश भोय, उमेर सांगडे, दिपक घोसाळकर, दिपक पडवळकर, फारूक बागवान, मुजाईद मुजावर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांनी आपल्या कामाचा अनुभव सांगून युवकांना पक्ष संघटनेसाठी कशा प्रकारे काम केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. युवा नेते राकेश शिंदे यांनी आ.तटकरे यांच्या संकल्पनेतील युवक कसा असावा याविषयी मौलिक विचार मांडले तसेच जेष्ठ नेते शिवरामभाऊ शिंदे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.








Be First to Comment