वाढदिवसानिमित्त भिक्षेकरी गृह व रुग्णांना ब्लॅंकेट व खाद्यपदार्थ वाटप 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔶🔶
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले बौध्द समाज युवा संघ नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे सुविध्य उपक्रम राबविण्यावर भर देते. नुकताच या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक अनोखा व आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

अनेकजण आपल्या वाढदिवशी वेगवेगळे बेत आखत पार्टी, मौजमस्ती करतात, मात्र याला अपवाद ठरत वाढदिवस कसा साजरा केला जातो याचा युवकांनी आदर्श घेण्यायोग्य उपक्रम संस्थेचे रोहा तालुका कोषाध्यक्ष आयु.सुविनय अहिरे सर यांच्या 49 व्या वाढदिवस निमित्त राबविण्यात आला.

कोलाड येथील कुष्ठ रोग निवारण भिक्षेकरी गृह येथील रुग्णांना ब्लॅंकेट व खाद्यपदार्थ वाटप तसेच रोहा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप करून करण्यात आले. सद्या कोरोनाचे संकट असून याकाळात अनेकजण प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायेत, याबरोबरच कडाक्याची थंडी पडल्याने गोरगरीब नागरिक असह्य थंडीने त्रस्त आहेत, यांना बौद्ध समाज युवा संघाने मदतीचा हात देत आधार दिला आहे.

कार्यक्रमाला कोलाड पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.बौद्ध समाज युवा संघ चे संस्थापक आयु.रमेश शिंदे अध्यक्ष आयु.जितेंद्र गायकवाड सचिव आयु.नरेश गायकवाड सर उपाध्यक्ष आयु.सुरेश गायकवाड सर खजिनदार दिपक दाभाडे,

रोहा तालुका अध्यक्ष रवी गायकवाड, सचिव प्रशांत जाधव, खजिनदार आयु.सुविनय अहिरे सर,संघटक नारायण गायकवाड,निलेश चव्हाण,रोहित शिंदे, बौद्धजन पंचायत समिती कोलाड शाखा क्र.17 चे अध्यक्ष निलेश घाडगे, शाखा 16 चे उपाध्यक्ष रमेश गायकवाड, माजी अध्यक्ष कोलाड विभाग सिद्धार्थ गायकवाड,खांब विभाग राजेंद्र कांबळे, भारतीय बौद्धमहासभा जेष्ठ सल्लागार आयु.मनोहर शिंदे सामाजिक कार्यकर्ते आयु.रामदास सुरलकर उपस्थित होते.









Be First to Comment