सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷
रायगड जिल्हा नाभिक संघाच्या अध्यक्षपदी महाड येथील युवा नेतृत्व दिनेश चंद्रकांत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नागोठण्याजवळील चिकणी येथील हाॅटेल बाळाराम येथील सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत नाभिक समाज बांधवांकडून ही निवड करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील काही समाज बांधवांनी जिल्हा समाज बांधवांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक लादली व जिल्हाध्यक्षपदी सुदाम शिंदे हे फक्त्त एका मताने विजयी झाले. विजयानंतर शिंदे व त्यांच्या टीमने समाजातील महत्वपूर्ण व्यक्तींना समाजाच्या काही निर्णयामध्ये डावलले तसेच काही तालुक्यातील समाज बांधवांमध्ये वाद विवाद निर्माण करून समाजात दुफळी निर्माण केली. तसेच हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरवात केली. त्यामुळे सुदाम शिंदे यांच्या अशा मनमानी कारभाराला कंटाळून रायगड जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील नाभिक समाज बांधव एकवटले व त्यांनी हा निर्णय घेतला.
दरम्यान मी फक्त्त दादा, मामा, काका असे गोड गोड बोलून वेळ निभावून न नेता कृतीतून कामे करून दाखवीन असे सांगून जिल्ह्यातील समाज बांधवांच्या विशेषतः सलून व्यवसायकांच्या समस्या सोडविणार असल्याचे अभिवचन यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे यांनी दिले.
समाज कार्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रायगड जिल्हा नाभिक समाज बांधवांची ही बैठक जिल्हा नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष जनार्दन मोरे (गुरुजी )यांच्या अध्यक्षतेखाली नागोठणे जवळील चिकणी येथील हॉटेल बाळाराम येथे संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष अनिल पवार, युवा नेते बाळासाहेब टके, दिनेश मोरे, शेखर घाडगे, सोपान मोहिते, सुनिल यादव, मोहन चव्हाण, रविंद्र टके, प्रविण खराडे, शैलेश रावकर, संतोष जाधव, विनोद पवार, रघुनाथ रसाळ, अशोक खंडागळे, राकेश पांडे, मंगेश शिर्के, बबन मोहिते सुधाकर निंबाळकर, समाजातील पत्रकार शामकांत नेरपगार, पत्रकार महेंद्र माने, गजानन इंदुलकर, विवेक कदम, विजय साळुंखे, मनोहर पांडे, सचिन दिवेकर, उत्तम हुलालकर, राजू दिवेकर, प्रमोद जाधव, किरण घाडगे, विश्वनाथ चव्हाण, चेतन पवार, संदेश पवार, सुमित संजय पांडे, वैभव मुकादम, संदिप कदम, जगन्नाथ कदम, संदिप साळुंखे, अनंत जाधव, रविंद्र जाधव, संदिप जाधव, प्रदिप जाधव, प्रकाश कदम, सचिन हुजरे, दिलीप जाधव, रुपेश साळुंखे, नरेश पवार, किशोर शिंदे, प्रमोद इंदुलकर योगेश शिर्के आदींसह रोहा, अलिबाग, तळा, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर, पाली, पेण, उरण आदी नऊ तालुक्यातील नाभिक समाजातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा नाभिक संघाची कार्यकारणी देखील निवडण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष - दिनेश मोरे(महाड ), कार्याध्यक्ष - सोपान मोहिते (रोहा ), उपाध्यक्ष - विनोद पवार (उरण ), मोहन चव्हाण (पेण ), सचिव - महेंद्र माने (नागोठणे ), सहसचिव -संतोष पवार (अलिबाग ), खजिनदार - योगेश शिर्के (तळा), सहखजिनदार - विवेक कदम (श्रीवर्धन ) आदी समाज बांधवांचा समावेश करण्यात आला. दरम्यान नवनिर्वाचित कार्यकारणीने समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक जिल्हा नाभिक समाजमंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी जाऊन दिलीपभाई टके यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्यावेळी दिलीपभाई टके यांनाई सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment