Press "Enter" to skip to content

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त आपटा येथे रक्तदान शिबिर

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर गजानन भोईर यांची उपस्थिती 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔶

कोरोना संसर्गांमुळे राज्यात अनेकांवर उपचार सुरू आहेत तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे.परंतु कोरोना पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त आपटा शिवसेना शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात चाळीस युवकांनी रक्तदान केले‌.यावेळी श्री सद्गुरू ब्लड बँकेची टिम उपस्थित होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर गजानन भोईर यांनी उपस्थिती दाखवून रक्तदान करणाऱ्या ग्रामस्थांचे मनोबल वाढविले .

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर , उपतालुका प्रमुख अशोक थोरवे , कराडे ग्रामपंचायत सदस्य नितेश कारंदे , युवासेना तालुका अधिकारी विक्रांत घरत , केलवने जिल्हा परिषद विभाग अधिकारी स्वप्नील भोवड , शाखा प्रमुख राजेंद्र घोलप ,उपशाखाप्रमुख संजय आंबवणे , आपटा ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ , समीर भालेकर , बाबु सय्यद , विनायक मेहतर , तेजस काकडे , सुनील पवार ,ओमकार पवार ,सुजित मेहतर , राज मेहतर , अभय रापटे , शिवदास भोईर , रुपेश राठोड ,सुशांत मेहतर , निशांत मेहतर , अमृत सोनवणे ,सागर भोवड , गणेश थोरवे ,रोहन भोईर ,मयुर भोईर , भूषण भोईर , कौस्तुभ जाधव ,यश काकडे ,अभिनव फुलमाळी आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.