Press "Enter" to skip to content

बोर्लेतील शेतकऱ्यांना बियाणांचे‌ वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

भातपड क्षेत्रावर रब्बी हंगाम‌ हरभरा बियाणे लागवड (टिआरएफए) कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले.यावेली पंचायत समिती माजी उपसभापती वसंत काठावले,कृषी अधिकारी आय.डी.चौधरी, प्रगतशिल शेतकरी गोविंद पाटील,फार्मंर रिसोर्स बॅंकेचे सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन कृषी पर्यंवेक्षक ढवल यांनी केले होते.

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून विविध बियाणांची लागवड करुन पिक घेता यावे यासाठी टिआरएफ ए कार्यंक्रमाअंतर्गंत त्यांना बियाण्यांचे वाटप केल्याचे माजी उपसभापती वसंत पांडुरंग काठावले यांनी बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.