सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔷🔷
पेण तालुक्यातील रामवाडी येथील एस टी कॉलनीतिल सर्व एस टी कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या घरा समोर राहुन तिन महिने पगार न मिळाल्याने तसेच आपल्या मागण्या मान्य न झाल्याने सरकार विरोधात आक्रोश आंदोलन केले यावेळी राज्य भर होत असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाची दखल घेउन राज्य शसनाने त्यांचा एक महिन्याचा पगार अदा केला.
कोरोनाच्या या महामारीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अनेक कर्मचा-यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवाशी वाहतूक सुरळीतपणे पार पाडली मात्र त्याच एसटी कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसून यासह महागाई भत्ता, दिवाळी उचल आणि दिवाळी भेट मिळाली नसल्याने एसटी कर्मचारी यांनी राज्यभर आपल्या घरासमोर आक्रोश आंदोलन सुरु केले होते
सरकारने कर्मचा-यांना वेतन, महागाई भत्ता, दिवाळी उचल तसेच दिवाळी बोनस न दिल्याने पेण तालुक्यात एस टी कर्मचारी यांनी आपल्या घरासमोर कुटुंबासह पगार दो पगार दो आंदोलन करत आक्रोश आंदोलन सुरु केले यात महाराष्ट्र एस टी कामगार संघटना विभागीय अध्यक्ष विलास खोपडे ,गणेश शेलार,तसेच एस टी कर्मचारी व त्याचे कुंटुब सहभागी झाले होते








Be First to Comment