Press "Enter" to skip to content

गरजू कुटुंबाची दिवाळी होणार साजरी : अनिल जाधव यांचा मदतीचा हात !

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔶🔶🔶

लॉकडाऊनमुळे हाताला रोजगार नसल्याने पैशाअभावी सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याने दिवाळी साजरी होणार की नाही , या चिंतेत सर्व आहेत .मात्र गरजू कुटुंबांना ऐन दिवाळीच्या तोंडावर समाजसेवक तथा विशेष कार्यकारी अधिकारी अनिल जाधव यांनी गरजू कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे . त्यामुळे या कुटुंबाची देखील दिवाळी साजरी होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

दिवंगत समाजरत्न मधुकर जाधव यांच्या स्मरणार्थ तांबस ता .कर्जत येथे समाजसेवक अनिल जाधव यांनी आजपर्यंत चालू असलेल्या अविरत गरीब – गरजू – निराधार कुटुंबातील व्यक्तींना कौटुंबिक गरजेसाठी लागणाऱ्या अन्न – धान्य व इतर वस्तूंचे वाटप करत आले होते , मात्र दिवाळी सण जवळ आला असल्याने अशा गरजू कुटुंबातील चिल्या – पिळ्यांची देखील दिवाळी साजरी होणे गरजेचे आहे , या उद्दात हेतूने दिपावली फराळ साहित्य मैदा , रवा , खोबरे , पोहे , डाळ्या , साखर , वेसपर सनफालर तेल , मिठाई इत्यादी साहित्य किट ३० कुटुंबांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आर बि आय बँक सदस्य मा . राजेंद्रजी भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजसेवक तथा विशेष कार्यकारी अधिकारी अनिल जाधव सह त्यांचे मित्र परिवार , कुटुंब सदस्य हजर होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.