Press "Enter" to skip to content

बौध्द समाज युवा संघ रायगड संस्थेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔷🔷

बौध्द समाज युवा संघ रायगड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम सोमवारी राबविण्यात आले आहे.वाढदिवस कसा साजरा केला जातो याच युवकांनी आदर्श घेण्यायोग्य उपक्रम आज संस्थेचे रोहा तालुका कोषाध्यक्ष आयु.सुविनय अहिरे सर यांच्या ४९ व्या वाढदिवस निमित्त रोहा तालुक्यातील कोलाड येथील कुष्ठ रोग निवारण भिक्षेकरी गृह येथील रुग्णांना ब्लॅंकेट व खाद्यपदार्थ वाटप तसेच रोहा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप करून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला कोलाड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यावेळी बौद्ध समाज युवा संघ रायगड चे संस्थापक आयु.रमेश शिंदे, अध्यक्ष आयु.जितेंद्र गायकवाड, सचिव आयु.नरेश गायकवाड सर, उपाध्यक्ष आयु.सुरेश गायकवाड सर, खजिनदार दिपक दाभाडे, रोहा तालुका अध्यक्ष रवी गायकवाड, सचिव प्रशांत जाधव, खजिनदार आयु.सुविनय अहिरे सर,संघटक नारायण गायकवाड,निलेश चव्हाण,रोहित शिंदे, बौद्धजन पंचायत समिती कोलाड शाखा क्र.१७ चे अध्यक्ष निलेश घाडगे, शाखा १६ चे उपाध्यक्ष रमेश गायकवाड, माजी अध्यक्ष कोलाड विभाग सिद्धार्थ गायकवाड,खांब विभाग राजेंद्र कांबळे, भारतीय बौद्धमहासभा जेष्ठ सल्लागार आयु.मनोहर शिंदे सामाजिक कार्यकर्ते आयु.रामदास सुरलकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.