सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔷🔷🔷
उरण आणि पनवेल तालुक्यातून दुर्मिळ होत असलेल्या टाकला या आयुर्वेदिक वनस्पतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने पुढाकार घेऊन “टाकला संवर्धन” ही अभिनव स्पर्धा आयोजीत केली होती. जून 2020 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत संपन्न झालेल्या टाकला संवर्धन उपक्रम व स्पर्धेचे प्रमुख म्हणून मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी कामकाज पाहीले.
या वेळी टाकळा संवर्धन मोहीमेत सहभागी झालेल्या टाकला प्रेमींना नुकताच वशेणी येथे विविध पुरस्कार देण्यात आले. सदर पुरस्कार समिधा निलेश म्हात्रे पंचायत समिती सदस्य उरण,यांच्या प्रमुख उपस्थीतीत देण्यात आले.

या टाकळा संवर्धनाचे परिक्षण राकेश रामभाऊ पाटील (अलिबाग),पुरुषोत्तम पाटील, संदेश गावंड, हरिश्चंद्र ठाकूर यांनी केले.तर प्रमाणपत्र डिझाईन करण्याचे काम कु.आदिनाथ पाटील यांनी केले. या संवर्धन स्पर्धेत निसर्ग प्रेमी, वृक्षवल्ली व वृक्ष मित्र, टाकला प्रेमी पुरस्काराने स्पर्धकांंना गौरविण्यात आले. रमेश पाटील केळवणे ,.लवेश म्हात्रे वशेणी , सुभाष कडू चिरनेर , पार्थ व व्याप्ती ठाकूर आवरे,पराग पाटील वशेणी, आदिनाथ पाटील वशेणी, प्रशांत पाटील दिघाटी,गजानन पाटील दिघाटी ,दिपक म्हात्रे वशेणी, संजय होळकर उरण ,सुरेश शिवकर यांचा समावेश आहे.विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमास समिधा म्हात्रे पंचायत समिती सदस्य उरण, निलेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, लवेश म्हात्रे माजी पंचायत समिती सदस्य उरण,गणपत ठाकूर ग्रामपंचायत सदस्य वशेणी, मनोज गावंड ,डाॅ.शरद पाटील,सतिश पाटील, ए बी तांडेल, विश्वास पाटील,गणेश खोत, किशोर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण ठाकूर यांनी केले








Be First to Comment