चांढवे ऊर्दू शाळेतील शिक्षिका नसरीन अन्सारी धनसे यांना वसंतस्मृती पुरस्कार 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔶🔶
महाड व पोलादपूर तालुक्यातील उर्फ्दू प्राथमिक शाळांमध्ये विशेष शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांची आता राज्यस्तरावर दखल घेतली जात असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या चांढवे ऊर्दू शाळेतील शिक्षिका नसरीन मुख्तार अन्सारी (संदेरीतील ऊर्दू शिक्षक तौफिक धनसे यांच्या पत्नी) यांचा ठाणे शहरातील मो. ह. विद्यालयात झालेल्या समारंभात वसंतस्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येऊन विशेष गौरव करण्यात आला.
आमदार निरंजन डावखरे व भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने वसंतस्मृती आदर्श शिक्षक व आदर्श संस्थाचालक पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. या वेळी आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, माजी महापौर अशोक राऊळ, नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस, भाजपा महिला आघाडीच्या ठाणे अध्यक्षा व नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सारंग मेढेकर आदींची उपस्थिती होती.
स्व.वसंतराव डावखरे स्मृती पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे. सध्या शिक्षक व आदर्श शिक्षकांना पुरस्कार दिले जात आहेत. या पुरस्काराची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल, असे नमूद करीत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, स्व.वसंतराव डावखरे यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना घरोघरी पेपर वाटून शिक्षण पूर्ण केले होते. अशा पध्दतीने कोकणातही अनेक गुणवंत विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. कोकणातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांकडून गुणवंत विद्यार्थी घडविले गेले आहेत. या पुरस्कार सोहळयाच्या माध्यमातून अशा शिक्षकांचे कौतूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील सहा शिक्षकांमध्ये महाड तालुक्यातील संदेरीतील ऊर्दू शिक्षक तौफिक धनसे यांच्या पत्नी चांढवे ऊर्दू शाळेतील शिक्षिका नसरीन मुख्तार अन्सारी यांच्यासह पालघर ते सिंधुदुर्गपर्यतच्या 37 शिक्षकांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, एन. एम. भामरे, किशोर पाटील, विनोद भानुशाली आदींनी नियोजन केले होते.
चांढवे उर्फ्दू शाळेतील शिक्षिका नसरीन मुख्तार अन्सारी (तौफीक धनसे) यांनी महाड तालुक्यातील साकडी ऊर्दू शाळा, दाभोळ शाळा येथे सेवाभावी वृत्तीने काम केले असून सद्या त्या चांढवे ऊर्दू शाळा येथे कार्यरत आहेत.








Be First to Comment