सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔷🔷🔷
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई संस्थेच्या वतीने राज्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येते. अश्याच राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कारासाठी रायगडचे युवा रांगोळीकार अनिरुद्ध संदिप खेडेकर यांची निवड करण्यात आली.यापूर्वीही त्यांना रांगोळी कलेसाठी पुरस्कार मिळाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा झूम अँपवर शानदार संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 101 मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला. या ऑनलाईन समारंभाचे सूत्रसंचालन गुणिजन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी केले. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प श्री. केशव जी महाराज सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुप्रसिद्ध तत्वचिंतक ह भ प श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. अशोकानंद जी जवळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक श्री. रमेश आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार श्री. सदानंद खोपकर, सुप्रसिद्ध आदर्श शिक्षिका श्रीमती मनिषा कदम घार्गे मॅडम, प्राचार्या श्रीमती रोशनी शिंदे मॅडम, प्राचार्या श्रीमती कल्पिता पर्शराम, प्राचार्या श्रीमती प्रगती साळवेकर, सामाजिक नेत्या डॉ. शुभदा जोशी तसेच धडाडीच्या डॅशिंग आयकर अधिकारी श्रीमती अरुणा परब यांनी या समारंभाला विशेष पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थिती नोंदविली आणि व्हिडिओद्वारे आपले शुभ संदेश दिले. “राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार 2020 ” या पुरस्काराचा अनिरुद्ध मानकरी ठरला असून त्याबद्दल त्यांचे अनेक क्षेत्रातून कौतुक होत आहे.







Be First to Comment