सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔷🔶
पोलीस खात्यात नोकरी करताना केवळ कायद्याचा धाक न वापरता कट्ट्यावर वेळ घालवणारी तरूणाईला खेळाच्या मैदानात आणणारा विश्वजीत काईंगङे सारखा अधिकारी दुर्मिळ असे गौरवोद्गगार खालापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यानी काईंगङे यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात काढले.
विश्वजीत काईंगङे यांनी अङीच वर्षापूर्वी खालापूर पोलीस निरिक्षक पदाचा कार्यभार स्विकारला होता.पोलीस ठाण्याला मिळालेला आएएसओ दर्जा टिकवताना अनेक गंभीर गुन्ह्याची ऊकल काईंगङे यानी केल्याचे सपोनी संजय बांगर यानी प्रास्ताविकात सांगितले.

नव्याने पदभार स्विकारलेले पोलीस निरिक्षक अनिल विभुते यानी काईंगङे यांची पोलीस प्रशिक्षणापासून असलेल्या मैञिला उजाळा देत सुरवातीपासून ङॅशिंग व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. व्यायाम आणि खेळावर विशेष प्रेम असलेला विश्वजीत मैञी जपणारा अधिकारी अशी स्तुती पोलीस निरिक्षक विभुते यानी केली.कोरोना काळात केवळ साहेबांनी केलेली मदत यामुळे नवे आयुष्य मिळाले अशी भावना पोलीस कर्मचारी जे पी म्हाञे आणि चव्हाण यानी व्यक्त केली.
निरोप समारंभात बोलताना विश्वजीत काईंगङे भावनिक झाले.अङीच वर्ष पोलीस ठाण्याचा कारभार सुरळित करण्याचे यश संपूर्ण टिमचे असल्याचे नमूद करताना कोरोनाचा काळ अतिशय कठिण असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस खात्यात नोकरित काळ वेळाचे भान नसते अशा परिस्थिती घराकङे दुर्लक्ष होते परंतु पत्नीची खंबीर साथ यामुळे कर्तव्य बजावता आले असे काईंगङे यानी सांगितले.निरोप समारंभासाठी खालापूरचे नगरसेवक संतोष जंगम,महिला पोलीस निरिक्षक अंबिका अंधारे,पोलीस उपनिरिक्षक शेखर लव्हे,पोलीस पाटील अनंता ठोंबरे, पोलीस कर्मचारी,पञकार,सामाजिक कार्यकर्ते व खालापूर नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment