Press "Enter" to skip to content

पेण गांधी मंदिर येथे आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा संपन्न

आकाश कंदील म्हणजे नवनिर्मितीचा प्रत्यक्ष आनंद ! 🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔷🔷

मूलभूत अधिकार संघर्ष समिती व विनोबा भावे जन्मस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा पेण गांधी मंदिर येथे आज संपन्न झाली.

या कार्यक्रमात नीला आपटे यांचे पुष्प देऊन सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी स्वागत केले. महात्मा गांधी वाचनालय येथे सकाळी साडेआठ ते दुपारी एक यावेळी झालेल्या कार्यशाळेला नीला आपटे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी ईला गोरे व वैभवी ध्रुव यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनविण्यास मदत केली. covid-19 च्या या अनलॉक काळात मास्क घालून विद्यार्थी वर्ग यात सहभागी झाला होता .ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच ठरली. कार्यशाळेस अत्यंत भरघोस प्रतिसाद मिळाला.

अनलॉक नंतर मुले पहिल्यांदाच घराबाहेर पडली आणि अगदी सर्वजण वेळेआधीच मास्क लावून हजर होते .कोरोना पंडेमिक मुळे 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला त्यामुळे बराच विद्यार्थी वर्गाला नाराज व्हावे लागले. याची नोंद घेत पुढेही अशीच कार्यशाळा आयोजित करावी यासाठी पालकांनी आग्रह धरला. कोरोना गाइडलाइन्स मुळे काही गोष्टींवर बंधने आली आहेत खरी ,परंतु आठ महिन्यानंतर आकाश कंदील ,चांदणी स्वतः बनवता आली आणि कार्यशाळेत भाग घेता आला त्यामुळे या वेळची दिवाळी इको फ्रेंडली आकाश कंदीलाने साजरी होणार म्हणून सर्वजण आनंदात होते.

यावेळी या कार्यशाळेत मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री.अण्णा वनगे,सौ. नंदा मात्रे,अप्पा सत्वे व मंदाकिनी गायकवाड उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.