Press "Enter" to skip to content

कृषी अधिकारी यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात शेतीची पाहणी


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔷🔷


रोहा तालुक्यातील किल्ला येथील शेतकऱ्यांच्या बांधांवरच काय ? तर कृषी अधिकारी प्रत्यक्षात शेतात उतरून भर उन्हात भात शेतीची पहाणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्याची भुमिका बजावण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र- किल्ला येथील शास्त्रज्ञ डाॅ.प्रमोद मांडवकर व डाॅ.राजेश मांजरेकर उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.तसेच भातावर करपा (पिस) असल्याचे कृषि विज्ञान केंद्र किल्ला यांना फक्त माहीती दिल्या क्षणी कोणत्याही आदेशाची वाट न पहाता स्वतः . डॉक्टर प्रमोद मांडवकर व डॉक्टर राजेश मांजरेकर यांनी . बळीराजा शेतकरी संघाचे पदाधिकारी दगडू बामुगडे यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्षात पहाणी करून पुढील रब्बी हंगामातील कडधान्ये लागवडी साठी विशेष माहीती देऊन . सहकार्याची भूमिका ठेवली याबद्दल शेतकरी वर्गाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच बळीराजा संघाचे पदाधिकारी दगडू बामुगडे वयाच्या ६६ वर्षी घेतली व सौभाग्यवती बामुगडे . यांचे वय ६०असून या दोघांनी मजुरांची वाट न पाहता भात कापणी ची सुरुवात केली असून तरुणांनी शेतीकडे वळण्याचा संदेश दिला आहे असे मत कृषी अधिकारी यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.