Press "Enter" to skip to content

सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा कोलाड मार्गाचा मांडला खेळ

कोटयावधी खर्च करूनही रस्त्याची अवस्था जैसे की वैसी : धुळीची कोंडी कायम ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔷🔶

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला रोहा कोलाड मार्ग कोलाड आंबेवाड़ी येथुन जोडलेला खड्यांचा रस्ता असा लौकिक मिळविलेल्या रोहा-कोलाड मार्गावरचे खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तसेच ठराविक ठेकेदारांकडून गेली तीन चार महिने एक दिवस आड करून हे खड्डे बुजवले जात आहेत तरी देखील खड्डे काही बुजता बुजत नाहीत अनेक उपाय योजना या मार्गावर संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आल्या मात्र त्या सर्व फोल ठरत मार्गाची परिस्थिती जैसे की वैसी असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा कोलाड या राष्ट्रीय राज्य मार्गाच्या दुरुस्थिचा अक्षरशः खेळ मांडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे,

मागील आठवड्यात या मार्गावर केवळ देखावा म्हणून डांबर मिश्रित खडी टाकून हे खड्डे बुवण्यात आले ते काही बुजवले तर काही अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहेत तसेच ते किल्ला ते रोठ दरम्यान बुजवले ते देखील मोजक्याच ठिकाणचे बुजवले गेले आहेत त्यात मुख्यतः कृषी विज्ञान विद्यापीठ बोरसोली सुदर्शन मोरे कॉम्प्लेक्स जैन वाडी मोरे विद्यालय व एक्सल स्टॉप व एच पी पेट्रोल पंप या ठिकाणचे खड्डे बुजवले गेले नसल्याने प्रवाशी वर्गाला याच खड्यांतून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे खड्डे बुजवणे ही केवळ सा बा खात्याकडून होत असलेली दिशाभूल असे सर्वत्र बोलले जात आहे .

लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन दुर्दशा झाली आहे.या रस्त्यावर कोटयावधि रुपये खर्ची होऊनही या मार्गाची अवस्था मात्र’जैसे थे’च आहे. रस्त्यावर खड्यांमुळे अक्षरशः दहशत पसरवली असून खड़ी व मातीने भरलेले खड्डे आता पुन्हा डोके वर काढू लागले आहेत.प्रचंड खड्यांनंतर आता धूळीने थैमान घातल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना काही सुचेना धुळीमुळे रहदरिचा प्रश्न मात्र चांगलाच ऐरणीवर आला आहे.त्यातच अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत असल्यामुले येथील प्रवासी नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.

कोलाड रोहा मार्ग हा जागतिक स्थरावर नावलौकिक आहे कारण या मार्गलगत मोठी औद्योगिक क्षेत्र वसलेले आहे आणि अशा या अवघ्या ११ किलोमिटर अंतराच्या रोहा-कोलाड या राज्य मार्गावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते.जड अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता मात्र जागोजागी अक्षरशः फुटला असून मोठं मोठे खड्यांचे समराज्य पसरले आहे गेली तीन महिने सा बा खात्याचे ठेकेदार हे खड्डे बुजवत आहेत मात्र खड्डे काही बुजता बुजत नसल्याने मागील दोन तीन महिने सातत्याने हे खड्डे खडी मिश्रीत मातीने बुजवले जातात तद्नंत मागील आठवड्यात तर चक्क डांबराच अमिश दाखवत खडी डांबर असे हे खड्डे काही मोजक्याच ठिकाणचे बुजवले तर उर्वरित खड्डे आता चक्क त्याची धूळ प्रवासी नागरिकांच्या घसा तोंडात जात असून डोळे फोडी होत आहे तर खड्डी रस्त्याभर पसरली असून दुचाकी वाहने चालवणे अवघड झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे खड्यांतुन पसरलेल्या खडीच्या कारणांमुळे दिवसागनिक अपघात होत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.