Press "Enter" to skip to content

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब ची पंचवार्षिक निवडणुक संपन्न

चेअरमनपदी महेंद्र पोटफोडे यांची सलग तिस-यांदा निवड ; तर उपाध्यपदी राम कापसे तर सचिवपदी धोंडू कचरे यांची निवड 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔶🔶🔶

रोहे तालुक्यासह रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमनपदी धडाडीचे युवा नेते महेंद्र पोटफोडे यांची सलग तिस-यांदा निवड झाली आहे.तर उपाध्यपदी राम कापसे व सचिवपदी धोंडू कचरे यांचीही दुस-यांदा निवड करण्यात आली आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयेंद्र भगत व गणपत पवार यांनी काम पाहिले.

संस्थेच्या आज ता.९ रोजी झालेल्या सभेमध्ये व पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेतंर्गत त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे,भाई पोटफोडे,शंकर म्हसकर,राम मरवडे, गजानन भोईर, धनाजी लोखंडे, बाळाराम धामणसे, हरिश्चंद्र धामणसे,संजय भिसे,मनोज शिर्के आदींसह मुख्याध्यापक सुरेश जंगम,दीपक जगताप, अनिल खांडेकर, नरेंद्र माळी,क्रुष्णाराम धनवी,सागर मोरे,चिंदू धामणसे ,प्रविण मरवडे, महेंद्र जवरत,भरत वारगुडे आदी उपस्थित होते.

२०१० साली संस्थेच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेल्या महेंद्र पोटफोडे यांनी शिक्षणमहर्षी, रायगड भूषण संस्थापक-अध्यक्ष श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर)यांच्या पावलावर पाऊल टाकून तसेच सर्व संस्थाचालकांना विश्वासात घेऊन नियोजंबद्ध पद्धतीने संस्थेच्या तिन्हही शाळांचा शैक्षणिक विकास करून व सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन संस्था नावारुपाला आणली.

तर नैसर्गिक चक्रीवादळ काळात संस्थेच्या तिन्हही शाळांचे झालेले नुकसान भरपाईसाठी त्यांनी अतिशय मेहनत घेऊन रोहा तालुक्यात सर्वप्रथम पुन्हा नव्याने इमारत उभी करून सर्वांचा विश्वास संपादन करून ते कौतूकास पात्र ठरले.तर खांब विभागाचा याही पुढे अधिकाधिक शैक्षणिक विकास कसा होईल यासाठी पूर्वीपेक्षा अधिक
चांगल्या पद्धतीने कामकाज करून
त्यासाठी नवनवीन शैक्षणिक योजना आम्ही सर्व संचालक मंडळ विद्यार्थी वर्गासाठी राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आपले अध्यक्षीय मनोगत नव्याने निवड करण्यात आलेले चेअरमन महेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.