सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के । 🔶🔷🔶
रोहे तालुक्यातील ग्रु.ग्रा.पंचायत खारगांव ग्रा.पंचायतीच्या वतीने दोन वर्षात विविध लोकोपयोगी विकासकामे मार्गी लावून आपली वचनपूर्ती पुर्ण केली आहे.
रायगडचे खा.सुनील तटकरे, रायगड पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांनी ग्रा.पंचायत विकासकामासाठी वेळोवेळी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याने सरपंच सलोनी आपणकर, उपसरपंच नितिन मालुसरे व सर्व सदस्य तसेच ग्रा.विकास अधिकारी दिलिप पाबरेकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामाची अमंलबजावणी करून काजूवडी गावठाण,प्रदूषित पाण्याची नुकसान भरपाई,तारेघर मंदिर,मुख्यमंत्री सडक योजनेद्वारे झापड येथील डांबरी रस्ता,राष्ट्रीय पेयजल योजने द्वारे पाणी पुरवठा व खारी येथे प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले प्रवेश द्वार आदी लोकोपयोगी विकासकामे दोन वर्षात मार्गी लावली आहेत.
तर पुढील तीन वर्षात याच पद्धतीने काम करून अधिकाधिक विकासकामे करणार असल्याचा निर्धार ग्रा.पंचायतीचे वतीने करण्यात आले असल्याचे सरपंच सलोनी आपणकर यांनी माहिती देताना सांगितले आहे.








Be First to Comment