Press "Enter" to skip to content

शेकापचे जेष्ठ नेते काका पाटील यांच्या वडीलांची पुण्यतिथी साजरी

सिटी बेल लाइव्ह । रमेश थळी । उरण । 🔷🔶🔷

नागाव मांडल आळी येथील शतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते काका पाटील यांचे प्रिताश्री कै पांडुरंग चांगू(बापु) पाटील यांची पुण्यतिथी ६नोहेंबर २०२० रोजी आज पाटीलवाडी येथे साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सागर कडू ,उदोजक राजा पडते,शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहालकर,म्हातवली सरपंच आंनद घरत,एड प्रदीप पाटील उदोजक सुनील पाटील,यतीन पाटील जनार्दन थळी,हरेश्वर थळी, आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कै पांडुरंग बापु यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्प हार अर्पण करुन नम्र अभिवादन केले या कार्यक्रमात माजी दिवंगत भारतातीय क्रिकेट संघाचे क्रिकेटपटू कै अजित वाडेकर यांनी स्थापन केलेल्या आखील भारतीय अपंग क्रीडा फोंडेशन या संस्थेला श्रीराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सागर काका पाटील यांनी १५०००चा धनादेश सागर कडू यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला.

त्याच प्रमाणे स्मृती स्मरणार्थ नविन पनवेल येथील शांतिवन कृष्ठ रोग आरोग्य संस्थेतील रूग्णांना स्नेह भोजनाचा लाभ पुष्कर प्रदीप पाटील व प्रतीक सुनील पाटील यांच्या तर्फे देण्यात आला या प्रसंगी काका पाटील यांनी आपल्या भावना व्येक करताना बापुंच्या आठवणीनींना उजाळा देत त्यांनी केलेल्या समाज कार्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांडल आलीतील तरुण प्रफुल्ल पाटील,दत्ता घरत बाबू ठाकुर यांनी परीश्रम घेतले तर आभार यतीन पाटील यांनी मानले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.