Press "Enter" to skip to content

पत्रकार आनंद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सिटी बेल लाइव्ह । जळगाव । प्रतिनिधी । 🔷🔷🔷

पनवेल येथील दैनिक पुढारीचे पत्रकार आनंद पवार यांचा वाढदिवस त्यांचा मूळ जन्मगावी जळगाव जिल्ह्यातील शिरसोदे या गावी ६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मित्रपरिवाराने मोठ्या जल्लोषात उत्साही व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

श्री.पवार हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका शिरसोदे ग्रामीण भागातील रहिवाशी असून ते गेली अनेक वर्ष पनवेल मध्ये वास्तव्य करत आहेत. आनंद पवार हे गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी समाजाच्या विविध स्तरावर न्याय देण्याचे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असुन अन्यायाविरुद्ध त्यांच्या लेखणी मुळे अनेकांना न्याय देण्याचे काम
ते करत आहे. आनंद पवार हे निर्भीड पत्रकार असून त्यांनी समाजहिताच्या अनेक गोष्टी मार्गी लावल्या आहेत. पवार यांचे पत्रकारिता क्षेत्राबरोबरच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा चांगल्या पद्धतीने उमटविला आहे. त्यांच्या धारधार लेखणीच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शिरसोदे येथील मूळ जन्मगावी त्यांच्या मित्र परिवारांनी आणि चाहत्यांनी पवार यांचा वाढदिवस अत्यंत जल्लोषात उत्साही व आनंदमय वातावरणात साजरा केला.

सायंकाळी येथील बुद्ध विहारात बौद्ध पूजा पाठ चा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर उपस्थितांना खीर दान वाटप करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अमृत पवार सेवानिवृत्त पोलीस पाटील एकनाथ पवार, भानुदास पवार, काशिनाथ संदांशिव, संजय नन्नवरे, भारत पवार, दिलीप कांबळे, दादाभाई पवार, यांच्यासह महिला पदाधिकारी आबालवृद्धांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार यांना उपस्थितांनी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात.तसेच श्री. पवार यांचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्यासह विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. तसेच जगन्नाथ पाटील, योगेशभाऊ सोनवणे, परेश पाटील,सुनील महाजन, प्रेमराज संदानशिव,राहुल(टिनु) बाविस्कर, अतुल पवार, विनोद ठाकरे, माजी उपसरपंच जयवंतराव पवार, शरद भारत पवार, रितेश(बॉबी)मोहिते, मयुर गुरव,यश (भाऊसाहेब)पवार,अभय पवार,अमोल निकम,अमोल पवार,कृष्णा महाजन, आदींनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.