Press "Enter" to skip to content

सोमेश राजीव खांडेकर या युवकाने केले आदर्शवत कार्य !

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य वितरण करून जपली सामाजिक बांधिलकी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव आणि समारंभावर सर्वत्र निर्बंध घातलेले असताना युवा वर्ग ते चोरीछुपे साजरे करत असल्याच्या घटनांची उदाहरणे दृष्टीपथात येत आहेत. पेशाने इंजिनिअर असलेला सोमेश राजीव खांडेकर या युवकाने आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत गरीब, आदिवासी आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करत युवा वर्गाला आदर्श घालून दिला आहे.

खालापूर तालुक्यातील जांबरुंग आदिवासी शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सोमेशने आपल्या कुटूंबाचा समाजसेवेचा वसा पुढे सुरू ठेवला आहे. ग्रुप ग्रामपंचायत जांबरूंगचे सरपंच रमेश गोपाळ खांडेकर, अनंता मेंगाळ – ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक राजीव गोपाळ खांडेकर यांनी त्याला या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले होते.

या छोटेखानी कार्यक्रमात सुरेश गोपाळ खांडेकर, संतोष तांडेल, सौ. जयवंती खांडेकर,सौ पुष्पा खांडेकर, सौ. रेश्मा खांडेकर, कटके आणि केदार सर यांनी भाग घेतला होता. सोमेशने सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न देऊन आपल्या वाढदिवसाच्या आनंदात सहभागी करून घेतले आणि मार्गदर्शनही केले. सोमेशच्या या अतुलनीय योगदानाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.