Press "Enter" to skip to content

मोहोपाडा येथे युवक काँग्रेसची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

एनएसयूआयच्या राष्ट्रीय समन्वयक व कोकण विभाग प्रभारी चेतना रॉय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस राज्य सचिव प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा खालापूर तालुका आढावा बैठक पार पडली.

यावेळी प्रमुख अतिथी चेतना राय यांनी एनएसयुआय मार्फत झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच संघटनेत महिला सशक्तिकरण हा मुद्दा लक्षात घेऊन जास्तीत जास्त महिलांना संघटनेत सहभाग करून घेण्यासाठी काही धोरणे ठरवण्यात आली.

या बैठकीमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष आकाश रहाटे ,युवक काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष सागर सुखदरे व जिल्हा सचिव प्रशांत खाने रसायनी युवक काँग्रेस विभाग अध्यक्ष बंटी ढवळे, खालापूर तालुका एन एस यु आय अध्यक्ष कुणाल जाधव, कार्याध्यक्ष शयान उस्मानी , एन एस यु आय पदाधिकारी अभिषेक सिंग, हासिम शेख, रसायनी विभाग अध्यक्ष दीवेश पाटील, महेश गुंजाळ प्रथमेश म्हात्रे, अदनान उस्मानी, नित्यानंद केदार, रोशन सिनलकर, हर्षद पाटील, कल्पेश ठाकूर, ऋषिकेश मेंढे, रोहित गुप्ता, सागर राठोड, प्रसाद ठोंबरे, सतीश गावडे, संतोष मारकड, आशिष जाधव, सचिन घोडके आदि मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.