सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔷
चौक येथे पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभा रहात असुन त्याचे भूमिपूजन विभागप्रमुख सुधीर ठोंबरे यांनी केले.
ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या सततच्या पाठपुराव्या मुळे,विभागप्रमुख सुधीर ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या सहकार्याने,महानगर गॅस लिमिटेड यांच्या सिआरएस फंडातून,पिरॅमल वॉटर प्रा.लिमिटेड याच्या सहभागातून चौक येथे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू होत आहे,त्याचे भूमिपूजन विभागप्रमुख सुधीर ठोंबरे व सरपंच कल्याणी थळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हा प्रकल्प चौक बाजारपेठ च्या जवळच असल्याने बाजारपेठ,चौक गाव,बाजारपेठ मध्ये आलेल्या ग्राहकांना,रिक्षा चालक,सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल असे सुधीर ठोंबरे यांनी सांगितले.हा प्रकल्प एक वर्ष पिरॅमल वॉटर प्रा.लिमिटेड यांच्याकडून मोफत उपलब्ध असणार असून त्यांनतर चौक ग्रामपंचायत यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे,₹ ५ मध्ये २० लिटर शुद्ध पाणी देण्यात येणार आहे,असे ग्रामविकासअधिकारी एस पी जाधव यांनी सांगितले.
पाणी उपलब्धतेनुसार त्याचे वितरण होईल व त्याचा विस्तार ग्रामपंचायत करणार असल्याचे उपसरपंच जयसिंराव देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमास, सदस्य सुरेश घाग,माजी सरपंच कविता कोंडीलकर,प्राची आंबवणे,दत्ता मांडे,यशवन्त राणे,किशोर थळकर ग्रामस्थ उपस्थित होते,हा प्रकल्प यशस्वी झाला तर अन्य ग्रामपंचायत मध्ये राबविण्याचा प्रयत्न करू असे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी सांगितले.








Be First to Comment