सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔷
इनरव्हील क्लब ऑफ कर्जतच्यावतीने 37 आदिवासी कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील कोढींबे नजीकच्या ठेंबर्ले वाडीत 37 आदिवासी कुटुंबांना तेल, पोहे, डाळ, साखर, मीठ, कडधान्य, बिस्कीट, साबण आदी जीवनाश्यक वस्तू भरलेले किट वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष म्हणून प्राची चौडिया, सेक्रेटरी उत्तरा वैद्य, खजिनदार करुणा पराडकर, तन्वी जोशी, वनिता सोनी, शिल्पा दगडे, सरस्वती चौधरी, जयश्री जोशी, मधुरा चंदन, पल्लवी सावंत, शीला गुप्ता आदी सदस्या उपस्थित होत्या.








Be First to Comment