Press "Enter" to skip to content

एमएमआरडीएच्या कामांची नगराध्यक्षांकडून पाहणी

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷

माथेरानच्या मुख्य प्रवेश भाग असलेल्या दस्तुरी जवळील काळोखी नावाने ओळखल्या जाणाऱ्या अति चढावाच्या ठिकाणी एमएमआरडीए मार्फत होत असणाऱ्या कामांत काही त्रुटी जाणून घेण्यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून होत असलेली कामे सुयोग्य पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांना सूचना दिल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे,जनार्दन पार्टे, नगरसेवक नरेश काळे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, कुलदीप जाधव आदी उपस्थित होते.

अति चढावामुळे श्रमिकांना हातगाडी ओढताना खूप त्रासदायक बनले होते.तर आगामी काळात इथे लवकरच ई रिक्षा सुरू होणार असल्याने अति चढावा बाबतीत वारंवार येत असलेल्या तक्रारी मुळे ठेकेदारांना सुध्दा कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या याकामी पुढील कामात अनाठायी व्यत्यय येऊ नये यासाठी कायमस्वरूपी सोक्षमोक्ष
लावण्यासाठी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी संबंधित ठेकेदारांना सूचित करून ज्यांच्या या कामाबद्दल तक्रारी आहेत त्या दूर करण्यासाठी उपस्थित राहण्याचे कळविले होते त्यानुसार दि.७ रोजी ठेकेदार नितीन लाधानी यांसह डेप्युटी इंजिनियर टेंभुरणेकर, प्रोजेक्ट मॅनेजर विजय पाटील, दिपसिंग, प्रोजेक्ट इंजिनियर अविनाश पदफोडे,दिलीप सिंग आदी उपस्थित होते.

श्रमिकांची काळोखी याठिकाणी होत असलेली दमछाक दूर करण्यासाठी आम्ही तत्पर असून शक्य तेवढ्या प्रमाणात चढ कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रोजेक्ट मॅनेजर विजय पाटील यांनी उपस्थितांना सांगितले तर या महत्वपूर्ण कामासोबत रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे झाडांच्या संरक्षणासाठी ग्याबियन वॉल बांधण्यात येणार आहेत त्यामुळे मातीची धूप होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत असे या कामाचे प्रोजेक्ट डायरेक्टर नितीन लाधानी यांनी सांगितले. मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रकाश सुतार, सुनील शिंदे यांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटीचे निवारण करण्याबाबतीत नितीन लाधानी तसेच विजय पाटील यांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे सर्वांचे समाधान झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.