Press "Enter" to skip to content

बी कॉम परीक्षेत पालीतील ज.नौ.पालीवाला महाविद्यालयाचा निकाल ९७ %

पालीवाला महाविद्यालयात बि कॉम परीक्षेत ८६% गुण मिळवून
रूकसार इब्राहिम महाडकर प्रथम 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्माशील सावंत । 🔷🔶🔷

कोव्हिडं 19 च्या प्रादुर्भावामूळे परीक्षा व निकाल प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने उशिरा पार पडली. ऑक्टोबर 2020 ला झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या बी कॉम परीक्षेत पालीतील ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाचा निकाल ९७% लागला. तर कु. रूकसार इब्राहिम महाडकर हीने ८६%मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. रुकसार च्या उज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

रुकसार महाडकर हिने अत्यंत खडतरव प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश प्राप्त केले आहे, तिचे वडील मिनिडोअर चालक असून आपल्या मुलीने खूप शिकावे, मोठे व्हावे यासाठी ते रुकसार च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सर्वोतोपरी सहकार्य व पाठिंबा देताना दिसतात.

अत्यंत कष्टाळू, शांत मनमिळाऊ अभ्यासुवृत्तीच्या रूकसारने उरी जिद्ध बाळगुन यशस्वी होण्याचा निःच्चय केला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आपल्या ध्येयाआड परिस्थिती आडवी येऊ नये यासाठी तिने मुलांची शिकवणी घेतली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ती वाटचाल करीत आहे.

तिने पाली मुस्लिम समाजातील प्रशिक्षित व समाज कार्यात नेहमी हातभार लावणारे वयो वृद्ध महिला हाजी रुकियाबी महामुद परबलकर यांची त्यांचे घरी जाऊन भेट घेवून दुआ मागितली. उच्चशिक्षित होऊन समाजाची, महिलांची सेवा व राष्ट्रासाठी योगदान देण्याचा मनोदय रूकसारने व्यक्त केला. तिच्या या यशात आई वडील, कुटुंबीय, गुरुजनवर्ग तसेच रायगड जिल्हा मुस्लिम वेलफेअर चे मोठे योगदान असल्याची नम्र कबुली रुकसार महाडकर ने दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.