Press "Enter" to skip to content

आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷

रोहे तालुक्यातील अति दुर्गम भागातील चिंचवली तर्फे अतोणे ग्रा.पंचायतीच्या वतीने आदिवासी बांधवांना शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

यावेळी उपसरपंच संजय मोते ,माजी सरपंच नाना शिंदे , तलाठी झावरे, गंगाराम काटकर , मारुती पवार ,दीपक काटकर ,विलास पवार, सुरेश पवार, सखाराम काटकर, बाबजी वाघमारे ,ग्रा. पं. सदस्या संगीता काटकर आदींस शिधापत्रिका लाभधारक आदिवासी बांधव उपस्थित होते.

उपसरपंच संजय मोते यांनी आदिवासी बांधवांना शिधापत्रिका मिळणे कामी फार मोलाचे असे सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ज्या आदिवासी बांधवांकडे शिधापत्रिका नव्हती अशा बांधवांना बँक व शासकीय कामासाठी तसेच रेशनिंग धान्य मिळण्यासाठी मोठी कुचंबणा करावी लागत असे. हीच अडचण ग्रा.पंचायतीने लक्षात घेऊन आदिवासी बांधवांना शिधापत्रिका मिळवून देऊन आदिवासी बांधवांचा शिधापत्रिका मिळणे बाबतचा मार्ग मोकळा केला आहे.तर शिधापत्रिका लाभधारक आदिवासी बांधवांनी ग्रा.पंचायतीच्या या कार्याबद्दल विशेष असे आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.