रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रोहा । याकुब सय्यद । 🔷🔶🔷
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर ( सअस ) यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याने मुस्लिम समाज बांधवांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर संतप्त समाज बांधवांनी रोहा पोलीस स्टेशनमध्ये जमा होऊन सदर समाज कंटकाविरोधात कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली.
चणेरा विभागातील सुडकोली येथील रवींद्र भौड या आरोपित इसमाने फेसबुकवर इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर ( स अ स ) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतप्त समाज बांधवांनी थेट रोहा पोलीस ठाणे गाठले व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
रोहा जामे मशिदीचे अध्यक्ष जाफर येरूनकर यांच्या नेतृत्वाखाली रोहा वरचा मोहल्ला अध्यक्ष अलीम मुमेरे, आहले हदीस जमात अध्यक्ष मौलाना मसरूल आलम, अष्टमी अध्यक्ष बाकर साष्टीकर, नगरसेवक अहमद दर्जी, जुबेर चोगले, रियाज शेटे, अ. कादिर रोगे, मजिद पठाण या शिष्ठ मंडळाने पोलीस अधिकारी वर्गाची भेट घेतली व आपल्या भावना प्रकट केल्या. तद्नंतर सुडकोली मुस्लिम जमात, चांडगाव जमात, कोकबन, न्हावे, नागोठणे येथील समाजातील प्रमुख मंडळींनी आरोपीवर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली. यावेळी खैरे खुर्द समाज अध्यक्ष अब्बास मुकादम, उपाध्यक्ष जाकीर खोत, सचिव अ. हमीद गीते,सचिव अ. गणी पेडेकर, अर्षद धनसे, आखलाक नाईक, फाईक करजिकर, यासिन पानसरे,मुशीर दर्जी, हनिफ दर्जी,समीर म्हेसकर, मुजीब दळवी, हाफिज एजाज किरकिरे,वसीम सावरठकर, सुलतान पानसरे, साजिद किरकिरे, राहील नागोठकर,जावेद चोगले,माझ सवाल आदी समाज बांधव उपस्थित होते.
स
दर आरोपिवर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामुळे समाज बांधवांनी शांतता राखाण्याचे आवाहन करण्यात आले. मंजर मोहम्मद अली जुईकर यांनी सदर आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस उप निरीक्षक आर आर अडगळे यांनी दिली.








Be First to Comment